घरदेश-विदेशअफगाणिस्तानवर तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित होताच पाकिस्तानने सुरक्षा दलात केले मोठे फेरबदल

अफगाणिस्तानवर तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित होताच पाकिस्तानने सुरक्षा दलात केले मोठे फेरबदल

Subscribe

अफगाणिस्तानवर तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित होतात शेजारील राष्ट्र पाकिस्तानने आपल्या सुरक्षा दलात मोठे फेरबदल केले आहेत. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील (LOC) जबाबदारी सांभळणारे लेफ्टिनेंट जनरल अजहर अब्बास यांना बढती देत त्यांची चीफ ऑफ जनरल स्टाफ या पदावर नियुक्त करण्यात आले. पाकिस्तानी सैन्यात झालेले हे फेरबदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. कारण चीफ ऑफ जनरल स्टाफ हे पद सुरक्षा प्रमुखानंतरचे महत्त्वपूर्ण मानले जाते.

पीटीआय रिपोर्टनुसार, लेफ्टनेंट जनरल अब्बास हे बलूच रेजिमेंटचे आहेत. त्यामुळे ते आता लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांचे स्थान घेतील. लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना रावळपिंडी स्थित १० कोरचे प्रमुख बनवण्यात आले आहे. मिर्झाच्या आधी अब्बास १० कोरचे नेतृत्त्व करत होते. रावळपिंडी कोर पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर तैनात आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या वृत्तपत्र डॉननुसार, लष्करप्रमुखानंतर पाकिस्तानी लष्करात चीफ ऑफ जनरल स्टाफ (सीजीएस) हे सर्वात महत्त्वाचे पद आहे. चीफ ऑफ जनरल स्टाफ हे जनरल मुख्यालयाच्या उपयोजन आणि परिचालन कामकाजासंदर्भातील जबाबदारी सांभळतात. एवढेच नाही तर चीफ ऑफ जनरल स्टाफ अंतर्गत पाकिस्तानी मिलिट्री ऑपरेशन आणि मिलिट्री इंटेलिजन्स डायरेक्टोरेट काम करतात. तर लेफ्टनंट जनरल मुहम्मद चिराग हैदर यांना मुल्तान कोरचे प्रमुख बनवण्यात आले आहे.

मुलतान कोर पाकिस्तानच्या मुख्य स्ट्राइक कोरपैकी एक आहे. वृत्तसंस्था पीटीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जरी लष्करात बदल्या आणि पोस्टिंग एक सतत होणारी गोष्ट आहे. मात्र पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत लष्कराच्या हस्तक्षेपामुळे जगभर यावर बारीक लक्ष ठेवले जाते. तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता स्थापन केल्याने हा बदल विशेषतः महत्त्वाचा मानला जातो. अलीकडेच भारतीय गुप्तचर संस्थांकडून दहशतवादी हल्ले आणि घुसखोरीबाबत देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -