घरदेश-विदेशPM Modi Pariksha Pe Charcha : तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रिल्स...

PM Modi Pariksha Pe Charcha : तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रिल्स बघता, पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मिश्कील सवाल

Subscribe

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत. संबोधनापूर्वी पंतप्रधान मोदींनी मुलांनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स, प्रोजेक्ट्स आणि पेंटिंग्सची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या या प्रदर्शनाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी ते शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं देत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना विचारले की, ऑनलाइन अभ्यासादरम्यान लक्ष केंद्रस्थात होत नाही? यापासून मुक्ती कशी मिळवायची? यावर पंतप्रधानांनी गमतीशीरपणे उत्तर दिले की, तुम्ही खरेच ऑनलाइन अभ्यास करताना रील की बघता? यावर संपूर्ण स्टेडियममध्ये हशा पिकला. ते पुन्हा म्हणाले की, माध्यम ही समस्या नाही, मनाची समस्या आहे. मनावर नियंत्रण असेल तर ऑनलाइन अभ्यासही फोकस करून करता येतो. ऑनलाइन हे शिकण्यासाठी आहे, ऑफलाइन म्हणजे आपण काय शिकलो ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आहे.

“… परीक्षेला सण बनवा”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, एप्रिल हा सणांचा, परीक्षांचा महिना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सणांचा आनंद नीट घेता येत नाही. अशापरिस्थिती परीक्षेला सण बनवा.

- Advertisement -

“पालकांनी त्यांची स्वप्ने मुलांवर लादण्याचा प्रयत्न करू नये’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सर्वप्रथम मी कुटुंबातील सदस्यांना आणि शिक्षकांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका, जी तुम्ही पूर्ण करू शकत नाही. या सर्व बाबी आपल्या मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय आहेत. पूर्वी शिक्षकांचा कुटुंबाशी संबंध असायचा. कुटुंबे आपल्या मुलांसाठी काय विचार करतात हे शिक्षक परिचित होते. शिक्षक काय करतात हे कुटुंब परिचित होते.”

“ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यतिरिक्त काही काळ इनरलाइन राहा”

“दिवसभरात काही क्षण काढा, जेव्हा तुम्ही ऑनलाइन नसाल, ऑफलाइन नसाल, पण तुम्ही इनलाइन असाल. जितके तुम्ही आत जाल तितकी तुम्हाला तुमची ऊर्जा जाणवेल. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर मला वाटत नाही की या सर्व त्रासांमुळे तुमच्यासाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण डिजीटल गॅजेट्सच्या माध्यमातून खूप सहज आणि मोठ्या प्रमाणावर गोष्टी साध्य करू शकतो. आपण याला संधी मानली पाहिजे, समस्या नाही.’ अस मोदी म्हणाले.

- Advertisement -

ऑनलाईन शिक्षणासाठी मोदींनी विद्यार्थ्यांना दिले डोश्याचे उहादरण 

पंतप्रधान मोदींनी एक उदाहरण देऊन सांगितले की, “तुम्ही ऑनलाइन खूप चांगला डोसा बनवायला शिकू शकता, पण खाऊ शकत नाही. डोसा खायचा तर खऱ्या आयुष्यात बनवावा लागतो. मग त्यांनी स्पष्ट केले की तुम्ही कोणत्याही विषयावर ऑनलाइन ज्ञान मिळवू शकता आणि ऑफलाइन तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी तयार करू शकता.

“परीक्षा हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कोणत्या ना कोणत्या परीक्षेतून जातो. परीक्षेची वेळ ही तुमची दैनंदिन दिनचर्या म्हणून हाताळा. तुम्ही जे करत आहात ते करा आणि त्यावर विश्वास ठेवा. उत्सवाच्या मूडमध्ये परीक्षा द्या, तुम्ही यशस्वी व्हाल. मनाशी ठरवा की परीक्षा हा जीवनाचा एक सोपा भाग आहे. आपल्या विकासाच्या प्रवासातील हे छोटे टप्पे आहेत. हा टप्पाही आपण पार केला आहे. यापूर्वीही आम्ही अनेकवेळा परीक्षा दिली आहे. हा विश्वास निर्माण झाला की हाच अनुभव येणाऱ्या परीक्षेसाठी तुमची ताकद बनतो.” असा विश्वास देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

“नव्या शैक्षणिक धोरणाला विरोधकांनी स्वीकार केला”

मोदी नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना म्हणाले की, “आम्ही 2014 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कामात गुंतलो होतो. या कामासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात विचारमंथन झाले. देशातील चांगले अभ्यासक, विज्ञान-तंत्रज्ञानाशी निगडित लोकांच्या नेतृत्वाखाली त्यावर चर्चा झाली. त्यावरून तयार केलेला मसुदा नंतर लोकांपर्यंत पोहोचवला, त्यावर १५-२० लाख इनपुट्स आले. एवढ्या मोठ्या प्रयत्नानंतर नवे शैक्षणिक धोरण आले आहे. सरकारच्या प्रत्येक कामाला विरोधक राजकीय पक्ष विरोध करतात, पण नव्या शैक्षणिक धोरणाला कोणीही विरोध केला नाही. सर्वांनी त्याचा स्वीकार केला.’

तालकटोरा स्टेडियमवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. पंतप्रधानांचे आगमन होताच संपूर्ण स्टेडियम स्टेडियममध्ये उपस्थित विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा गजर झाला. कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे शिक्षणमंत्र्यांनी आभार मानले. व्हर्च्युअल माध्यमातून ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे त्यांनी विशेष आभार मानले.


भ्रष्टाचारप्रकरणी अनिल देशमुख अन् सचिन वाझेंसह कुंदन शिंदेंना सीबीआय आज ताब्यात घेणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -