घरताज्या घडामोडीBudget Session of Parliament: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु, दोन सत्रांत...

Budget Session of Parliament: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु, दोन सत्रांत कामकाज

Subscribe

११ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात तर १२ मार्चला संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा असणार आहे. ८ एप्रिल २०२२ रोजी अधिवेशन संपणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात १ फेब्रुवारीला केंद्र सरकार संसदेत बजेट सादर करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दोन सत्रांट सभागृहाचे कामकाज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ११ फेब्रुवारीला अधिवेशनाचा पहिला टप्पा होणार आहे. तर दुसरा टप्पा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. संसदेचे अधिवेशन ८ एप्रिलपर्यंत चालणार असून काही दिवस विश्रांतीसुद्धा देण्यात आली आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. १ फेब्रुवारीला संसदेत बजेट सादर करण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात तर १२ मार्चला संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा असणार आहे. ८ एप्रिल २०२२ रोजी अधिवेशन संपणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.

- Advertisement -

संसद भवनातील ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभाचे सभापती एम. वेंकैया नायडू यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत की, संसदेच्या अधिवेशनाची कोरोना नियमांचे पालन करुन तयारी करण्यात यावी. सर्व उपाययोजना कराव्यात. तसेच दोन्ही महासचिवांना कोरोना परिस्थितीची सखोल माहिती घेऊनच अर्थसंकल्पीय अधिवशेनाचे आयोजन करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. २०२० मधील संसदेचे एकमेव पावसाळी अधिवेशन होते जे कोरोना नियमांचे पालन करुन पूर्णवेळ घेण्यात आले होते.

- Advertisement -

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवनाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ज्या खासदारांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांची वशेष काळजी घेण्यात यावी त्यानुसार तयारी करावी अशा सूचना लोकसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. राज्य सभा सचिवालयाचे ६५ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. तर लोकसभा सचिवालयातील २०० आणि त्यांच्या संबंधित १३३ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


हेही वाचा : WhatsApp Chatbot Launch : मत मागताना वाकलेले लोक नंतर ताट होतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -