महागाईच्या मुद्द्यावरून गाजणार संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस; काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत

संसदेच्या कामकाजादरम्यान बोलताना किंवा भाषण करताना खासदारांना काही असंसदीय शब्दांचा वापर करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे असंसदीय शब्दांवरून देखील संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे

parliament monsoon session congress will protest against inflation Agnipath scheme at parliament premises

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस महागाईच्या मुद्द्यावर गाजण्याची चिन्ह आहेत. विरोधकांकडून या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महागाईसह अनेक मुद्द्यावरून काँग्रेस सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आज संसद परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहे. मात्र अलीकडेच लोकसभा सचिवालयाने संसद भवन परिसरात आंदोलन, निदर्शन, उपोषण करण्यास बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनावर काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : आजपासून संसदेच पावसाळी अधिवेशन; अग्निपथसह अनेक मुद्द्यावरून विरोधक होणार आक्रमक

दरम्यान सोमवारी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. यावेळी देखील विरोधकांनी संसदेत विविध मुद्द्यावरून आवाज उठवण्यास सुरुवात केली, मात्र कामकाज दुपारनंतर स्थगित झाले. मात्र आजपासून संसदेच्या अधिवेशनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. यात अनेक दिवसांपासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षा सरकारविरोधात विविध मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात मग महागाई, इंधनाच्या वाढत्या किंमती, रुपयाचे अवमूल्यन, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवर आकारलेला जीसटी, अग्निपथ योजना, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, वनाधिकार कायद्यातील बदल अशा विविध मुद्द्यावरून आणि धोरणांवरून काँग्रेस विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही विरोधकांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे या अधिवेशनात सरकारला कोंडीत पडकण्यासाठी तरी विरोधक एकत्र असतील का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.

यात संसदेच्या कामकाजादरम्यान बोलताना किंवा भाषण करताना खासदारांना काही असंसदीय शब्दांचा वापर करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे असंसदीय शब्दांवरून देखील संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. शब्दांवरील बंदी म्हणजे एकप्रकारे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आता विरोधी पक्षांकडून होत आहे. त्यामुळे विरोधक यावरून आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

संसदेत ‘या’ असंसदीय शब्दांचा वापर करण्यास  मनाई 

लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 या शीर्षकाखाली अशा शब्द आणि वाक्यांची यादी तयार केली आहे, ज्यांना लोकसभा आणि राज्यसभेसह राज्यांच्या विधानसभांमध्ये असंसदीय घोषित करण्यात आलं होतं. या यादीत समाविष्ट शब्द आणि वाक्ये ‘असंसदीय अभिव्यक्ती’ या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. ज्या अंतर्गत जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद, भ्रष्ट, बाल बुद्धी, स्नूपगेट, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, पिट्ठू , कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, खालिस्तानी, विनाश पुरुष, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, गूंस, घड़ियाली आंसू, असत्य, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागीरी, बेचारा, संवेदनहीन, सेक्सुअल हरेसमेंट असे शब्द चर्चेदरम्यान दोन्ही सभागृहात वापरता येणार नाहीत. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेनुसार, अशा शब्दांचा वापर सामान्य आचरणासाठी अशोभनीय मानला जाईल आणि सभागृहाच्या कामकाजाचा भाग होणार नाही.


असंसदीय शब्दांवरून राष्ट्रवादी – काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल