घरदेश-विदेशशशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Subscribe

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने शशी थरूर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शशी थरूर यांनी यापूर्वीच समन्स जारी करण्यात आला होता. आज झालेल्या सुनावणीत त्यांनी कोर्टाने दिलासा दिला आहे.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली असून यामध्ये काँग्रेस नेता आणि याप्रकरणातील संशयीत आरोपी शशी थरूर यांनी कोर्टाने अटकपूर्व जामी मंजूर केला आहे. थरूर यांना एक लाख रूपयांचा जामीनपत्रही भरावा लागणार आहे. थिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर आजच्या सुनावणीत निर्णय देण्यात आला. शशी थरूर यांना सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी यापूर्वीच आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आला आहे.

Shashi-Sunanda
सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर

सिब्बल यांचाही अटकेला विरोध

दरम्यान, या प्रकरणातील विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी काल दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आजकरता निर्णय सुरक्षित ठेवला होता. पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी शशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला कोर्टात विरोध केला होता. अर्जाला विरोध करताना सरकारी वकील म्हणाले होते की, आरोपी शशी थरूर अटकपूर्व जामीनामुळे देश सोडून पळून जाऊ शकतात. यावर थरूर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टासमोर हजर झाले होते. त्यांनी यावेळी सांगितले की, खासदार शशी थरूर यांच्याविरोधात चार्जशीटदेखील दाखल करण्यात आली आहे. यामुळे त्यांना अटक करण्याची आवश्यकता नाही.

- Advertisement -

थरूर यांना समन्स जारी

सुनंदा पुष्कर गूढ हत्येसंबंधी त्यांचे पती शशी थरूर यांच्या अटकेसाठी मंगळवारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी ५ जून रोजी थरूर यांना कोर्टाने समन्स जारी केला होता. यामध्ये ७ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यांनी दिले होते. आता अटकपूर्व जामीन अर्ज मंजून झाल्यामुळे शशी थरूर यांना दिलासा मिळाला आहे.

शशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -