घरताज्या घडामोडीआरजेडीचे आमदार सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा; फ्लोअर टेस्टमध्ये अडचण येण्याची...

आरजेडीचे आमदार सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा; फ्लोअर टेस्टमध्ये अडचण येण्याची शक्यता

Subscribe

आरजेडी नेते आणि आमदार सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. पाटणातील शास्त्री नगर भागातील घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बहुमत चाचणीपूर्वी आमदार सुनील सिंह यांच्या घरावर छापेमारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरजेडी नेते आणि आमदार सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. पाटणातील शास्त्री नगर भागातील घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बहुमत चाचणीपूर्वी आमदार सुनील सिंह यांच्या घरावर छापेमारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, नोकरी घोटाळ्यातील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.  (Patna Bihar Raids By Central Agency Are Underway At The Residence Of Rjd Mlc Sunil Singh)

सीबीआयची ही कारवाई बिहार विधानसभेतील महाआघाडी सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या आधी घडली आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बुधवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावरही मतदान होणार आहे.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

2004-2009 च्या रेल्वे भरती घोटाळ्याप्रकरणी आमदार सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात जमीन देण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे घेण्यात धोका असल्याने नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्यात आली. त्याचवेळी असे बेकायदेशीर काम करण्याची जबाबदारी लालूंचे तत्कालीन ओएसडी भोला यादव यांच्यावर देण्यात आली होती.

- Advertisement -

आमदार सुनील सिंह हे सहकारी संस्थेशी संबंधित आहेत.आरजेडीचे खजिनदार देखील आहेत. शिवाय, सीबीआयचे पथक आरजेडी खासदार अशफाक करीम यांच्या घरीही पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यन, बिहारनंतर झारखंडमध्येही सीबीआय कारवाई करत आहे. बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणी प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांची चौकशी केल्यानंतर केंद्रीय एजन्सीने येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.


हेही वाचा – पूरस्थितीमुळे आजही राजस्थानमधील 6 जिल्ह्यांमध्ये शाळा राहणार बंद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -