घरताज्या घडामोडीIndira Gandhi Death Anniversary: 'नारी शक्तीचं उत्तम उदाहरण होत्या इंदिरा गांधी', राहुल...

Indira Gandhi Death Anniversary: ‘नारी शक्तीचं उत्तम उदाहरण होत्या इंदिरा गांधी’, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ऑपरेशन ब्लू स्टरवेळी ३१ ऑक्टोबर १९८४मध्ये त्यांच्याच शीख बॉडीगार्डने त्यांची गोळ्या घालून हत्या केली

देशाच्या महिल्या माजी महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज ३७वी पुण्यातिथी. दिवंगत काँग्रेस नेत्या आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ऑपरेशन ब्लू स्टरवेळी ३१ ऑक्टोबर १९८४मध्ये त्यांच्याच शीख बॉडीगार्डने त्यांची गोळ्या घालून हत्या केली. देशातील एकमात्र महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याद्वारे अनेक नव्या सुधारणा झाल्या. आज त्यांच्या नसण्याची उणीव काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण भारताला जाणवते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृर्ती स्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्विट करत ‘माझी आजी शेवटच्या क्षणापर्यंत न घाबरता देशाची सेवा करत होती.त्यांचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणा स्रोत आहे. नारी शक्तीचे एक उत्तम उदाहरण इंदिरा गांधी होत्या. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाने देखील ट्विट करत म्हटले आहे की, इंदिरा गांधींनी त्यांनी ताकदीचे प्रतिनिधीत्व केले. त्या बलिदानाचे प्रतीक आहेत. त्यांनी सेवेचे व्रत घेतले. भारताची आर्यन लेडी,भारताची पहिली महिला पंतप्रधान आणि सच्ची भारत रत्न श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यातिथी निमित्त विनम्र अभिवादन.

काँग्रेस पक्ष आज इंदिरा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. रविवारी काँग्रेस मुख्यालयाबाहेर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना दिल्ली काँग्रेस आणि देशभरातील महिला काँग्रेस कार्यकर्त्या सामील होणार आहेत.

इंदिरा गांधी यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी

 

  • इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी प्रयागराज येथे झाला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या कन्या आहेत.
  • इंदिरा गांधी यांना बालपणी ‘मंकी ब्रिगेड’ या नावाने हाक मारत असतं.
  • १९५९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड झाली. तर १९६४ साली त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या.
  • १९६६ साली तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्री यांच्या अचानक मृत्यूनंतर देशातील पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांची निवड करण्यात आली.
  • इंदिरा गांधी यांनी १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धावेळी आणि ऑपरेशन ब्लू स्टार सारख्या महत्त्वाच्या घटनांमध्ये अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती.

    हेही वाचा – National Unity Day 2021: सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने का साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस?

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -