घरट्रेंडिंगइन्स्टाग्राम मॉडेलला धार्मिक स्थळासमोर बॉयफ्रेंडसोबत सेक्स प्रँक करणे पडले महागात

इन्स्टाग्राम मॉडेलला धार्मिक स्थळासमोर बॉयफ्रेंडसोबत सेक्स प्रँक करणे पडले महागात

Subscribe

सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढण्यासाठी इतरांसोबत किंवा आपल्याच व्यक्तींसोबत प्रँक करून त्याचे व्हिडिओ पोस्ट करण्याची चांगलीच क्रेझ आहे. मात्र हीच क्रेझ तुम्हाला थेट जेलमध्ये पाठवू शकते. असेच काहीसे ताजिकिस्तानमधील ऑनलाईन प्रँक स्टारसोबत घडले आहे. ताजिकिस्तानच्या ऑनलाईन प्रँक स्टार रुस्लान मुरोद्झोंजोडाला रशियाच्या धार्मिक स्थळासमोर सेक्स प्रँक करणे महागात पडले आहे. धार्मिक स्थळासमोर अश्लील प्रँक केल्यामुळे त्याच्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला १० महिन्यांसाठी तुरुंगात टाकले आहे.

रुस्लान मुरोद्झोंजोडा सोशल मीडियावर रुस्लान बोबियेव नावाने प्रसिद्ध आहे. त्याने रेड स्क्वायरवर सेंट बेसिल चर्चच्या जवळ अश्लील प्रँक व्हिडिओ बनवला होता. यादरम्यान रुस्लानने पोलीसांचे जॅकेट घातले होते.

- Advertisement -

पण या व्हिडिओमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपाखाली दोघांना अटक केली असून १० महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. जगप्रसिद्ध चर्चसमोर रुस्लानची गर्लफ्रेंड चिस्टोवा त्याच्यासमोर गुडघे टेकून बसून व्हिडिओ करत होती. याप्रकरणी दोघांनी इन्स्टाग्रामवर माफी मागूनही मॉस्कोच्या टावर्सकोई जिल्ह्यातील कोर्टाने दोघांनाही दोषी ठरवले आहे.

रुस्लानला शिक्षेनंतर ताजिकिस्तानला पाठवले जाईल. रुस्लान हा एक ऑनलाईन प्रँक स्टार असून त्याची १९ वर्षीय गर्लफ्रेंड चिस्तोवा पण इन्स्टाग्राम मॉडेल आहे. शिक्षेपूर्वी चिस्तोवाने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये माफी मागत म्हटले होते की, ‘हा व्हिडिओ लोकांना आवडणार नाही आणि यामुळे भावना दुखावेल याचा विचार केला नव्हता.’

- Advertisement -

हेही वाचा – नशीब असावे तर असे! टाईमपाससाठी खेळला लॉटरी अन् झाला करोडपती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -