घरदेश-विदेशpaytm खंडणी प्रकरणः फ्लॅट घेण्यासाठी मागितली होती खंडणी

paytm खंडणी प्रकरणः फ्लॅट घेण्यासाठी मागितली होती खंडणी

Subscribe

पेटीएम कंपनीचे एमडी विजय शेखर शर्मा यांना २० कोटींची खंडणी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले आहे. ४ कोटींचा फ्लॅट घेण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी सोनिया धवनचा खुलासा.

पेटीएम कंपनीचे एमडी विजय शेखर शर्मा यांना २० कोटींची खंडणी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये तीन अन्य आरोपींसह कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी सोनिया धवन आणि तिचा पती रूपक जैन यांचाही समावेश आहे. दिल्लीतील ४ कोटींचा फ्लॅट विकत घेण्याची इच्छा होती. पैसे कमवण्यासाठी गैरमार्ग तिने स्वीकारला असल्याचा खुलासा तिने केला आहे. कंपनीच्या विश्वासाची माहिती तिच्याकडे असल्यामुळे त्याचा गैरवापर करुन एमडी विजय शेखर शर्मा यांच्याकडून २० कोटींची खंडणी मागितली होती. मात्र पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अखेर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पेनड्राईव्ह, हार्डडिक्स, कॉल रेकॉर्ड आणि कंपनी संबधात असलेली गुप्त माहिती पोलिसांनी हस्तगत केली आहे.

काय आहे प्रकरण

कंपनीचे एमडी विजय शेखर शर्मा यांना २० सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅप कॉल आला होता. या कॉलवर २० कोटींची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास पेटीएम वापरणाऱ्यांचा खाजगी डेटा लीक करण्याची धमकी देण्यात आली. कॉल करणाऱ्याने शर्मा यांना पेटीएमचा एक अकाऊंट नंबर दिला. या नंबरवर १५ ऑक्टोबर रोजी दोन लाख रुपयांची रक्कम ट्रांसफर केली होती. यानंतर शर्मा यांनी त्यांच्या धमकीला गंभीरतेने घेतले. विजय शर्मा यांचा भाऊ अजय शर्मा यांनी पोलिसांकडे याची तक्रार केली. कंपनीची उपाध्यक्षा सोनिया धवन आणि तिचा पती रूपक जैन यांनीच हा खंडणीचा फोन केला असल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्या बरोबर कंपनीचे काही कर्मचारीही सामील होते. सोनिया धवन ही मागील १० वर्षांपासून कंपनीत कार्यरत होती. कंपनीच्या कॉम्प्यूटरचा पासवर्ड माहिती असल्यामुळे सोनियाने खाजगी डेटा चोरला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -