घरताज्या घडामोडीMP: ७०० झाडांना वाचवण्यासाठी बासरी वाजवून लोकांनी झाडांना बांधली राखी

MP: ७०० झाडांना वाचवण्यासाठी बासरी वाजवून लोकांनी झाडांना बांधली राखी

Subscribe

गेल्या वर्षी मुंबईतील आरे कारशेडमधील झाडे वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करत आरेमध्ये जोरदार निदर्शने केली होती. अशाच प्रकारे मध्य प्रदेशात देखील सध्या आंदोलन केली जात आहेत. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये रस्ता तयार करण्यासाठी ७०० झाडे तोडली जाणार आहेत. यामुळे शेकडो लोक झाडांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरली आहेत.

वास्तविक, बालाघाटातील वैनगंगा नदीच्या काठी रस्ता बांधण्यासाठी तब्बल ७०० झाडे तोडली जाणार आहेत. पण तिथल्या लोकांनी याला विरोध केला आहे. लोक झाडे वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करत आहेत. काही लोक झाडांना रक्षा सूत्र बांधत आहे तर काही जण बासरी वाजवून निषेध करत आहेत. तसेच अनेक जण चित्रांच्या माध्यमातून झाडे न तोडण्याचा संदेश देत आहेत. आंदोलन करत असलेल्या एक विद्यार्थी म्हणतो की, ‘रक्षाबंधन येत आहे. मी झाडांना राखी बांधून त्यांना वाचवण्याची शपथ घेतली आहे. ज्याप्रकारे आपण आपल्या भावाच्या रक्षणासाठी राखी बांधतो, तशीच ही भावना आहे की, ही झाडे तोडू दिली जाणार नाहीत.’

- Advertisement -

याबाबत बालाघाटचे माजी नगरपालिका अध्यक्ष रमेश रंगलानी म्हणतात की, ‘आमचा विरोध रस्ता बांधण्यासाठी नसून ही झाडे तोडण्यासाठी विरोध आहे. बालाघाटचे ५५ संस्थांनी झाडे न तोडण्यासाठी आवाज उठवला आहे. यामध्ये माजी मंत्री आणि आमदार गौरीशंकर बिसेन यांचे समर्थन आहे.’

दुसरीकडे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, त्यांना ५०० हून अधिक झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. डीएफओ अनुराग कुमार म्हणाले की, ‘आम्हाला पीडब्लयूडीने निवेदन दिले आहे की, त्यांना डेंजर रोडवर रस्ता तयार करायचा आहे. यासाठी सुमारे ३० हेक्टरमध्ये असलेली झाडे तोडण्याचा निर्णय सर्वेक्षणानंतर उच्चस्तरीय समितीने घेतला आहे.’ सध्या रस्त्यांसाठी येथे झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु स्थानिक लोक त्यांच्या पद्धतीने त्यांना वाचविण्यात गुंतले आहेत. आता त्यांची मोहीम कितपत यशस्वी ठरते हे पाहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – निर्दयी! उंटाचे तोडले पाय; रस्त्याच्या कडेला ४ दिवस तडफडत होता उंट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -