Saturday, March 6, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Related Story

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. मुंबईसह दिल्ली आणि इतर शहरांमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार शनिवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८८.४४ रुपये तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ९४.९३ रुपयांवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून पेट्रोलची किंमत शंभरी गाठणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८८.४४  रुपये आहे, त्याचबरोबर, डिझेलचे दर दिल्लीत आज ७८.७४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ९४ रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ८५.७० रुपये आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

- Advertisement -

कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ८१.९६ रुपये, कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८९.७३रुपये, चेन्नईमध्ये डिझेलचा दर ८३.५२ रुपये आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९०.७० रुपये आहे. बंगळुरूमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ८३.४७, बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९१.४० रुपये आहे. हैदराबादमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ८५.८९रुपये, हैदराबादमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९१.९६रुपये आहेत.

परभणीत पेट्रोल गाठणार शतक!

राज्यात देखील इंधनदर वाढी विरोधात सर्वसामान्यांना याचा फटका बसतोय. परभणीमध्ये सर्वात जास्त पेट्रोलचे दर असून प्रतिलिटर ९७ रूपयांनी पेट्रोलची विक्री केली जात आहे. वाढत्या पेट्रोल दरांमुळे सामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -