बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये मिळणारा व्हायरल मेसेज खोटा; केंद्र सरकारची माहिती

देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. यातील बहुतांश योजनांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जात आहेत. मात्र वेळोवेळी सायबर गुन्हेगार सरकारी योजनांच्या बहाण्याने मेसेज व्हायरल करत असतात. असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे.

देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. यातील बहुतांश योजनांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जात आहेत. मात्र वेळोवेळी सायबर गुन्हेगार सरकारी योजनांच्या बहाण्याने मेसेज व्हायरल करत असतात. असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, ‘प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजने’अंतर्गत बेरोजगार तरुणांना सरकारकडून दरमहा 6,000 रुपये भत्ता दिला जात आहे. असा कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल तर सावधानता बाळगण्याची गरज असल्याची माहिती सरकारने ट्विट करून दिली आहे.

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजमध्ये पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत मोदी सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 6 हजार रुपये भत्ता देत असल्याचा दावा केला जात आहे. या योजनेसाठी नोंदणी सुरू झाल्याचा दावाही संदेशात केला जात आहे. तुम्हाला नोंदणी करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे. दरम्यान, पीआयबीने अधिकृत ट्विटर अकाउंटवर फॅक्ट चेकद्वारे माहिती दिली आहे.
पीआयबीच्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अशी कोणतीही योजना सरकार चालवत नाही. ट्विटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, हा मेसेज खोटा आहे आणि भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही. यासोबतच असे मेसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहनही पीआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.

असा कोणताही मेसेज आल्यास PIB द्वारे ते तपासून पाहू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही यासंबंधीची माहिती व्हॉट्सअॅप क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: [email protected] वर मेल करू शकता.


हेही वाचा – ऐकावं ते नवलच! हिवाळी अधिवेशनाचा खर्च 100 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता