कोरोनापासून बचाव करू शकत नाही प्लॅस्टिक शील्ड – संशोधन

plastic face shields may not protect against COVID-19
कोरोनापासून बचाव करू शकत नाही प्लॅस्टिक शील्ड - संशोधन

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जस जसा वाढू लागला तस तसे कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जाऊ लागले आहेत. यामध्ये मास्क असो, सॅनिटायझर असो, प्लॅस्टिक शिल्ड असो किंवा सोशल डिस्टन्सिंग. या सर्व गोष्टींचा अवलंब सध्या केल्या जात आहे. कोरोनाच्या काळात निरोगी जगण्यासाठी या गोष्टी अत्यावश्यक झाल्या आहेत. पण यादरम्यान केलेल्या संशोधनातून कोरोना संदर्भात अनेक खुलासे होत आहेत. आता सतत वापरण्यात येणारा प्लास्टिक शिल्ड कोरोनापासून बचाव करू शकत नाही, असे समोर आले आहे.

जपानच्या एका संशोधनातून समोर आले आहे की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक शिल्ड फारशा उपयुक्त नाही आहे. प्लास्टिक शिल्ड कोरोना रोखण्यासाठी किती उपयुक्त आहे, याविषयी रिकेन सेंटर फॉर कॅम्प्युटर सायन्समध्ये अभ्यास करण्यात आला. येथील फुगाकू सुपर कॅम्प्युटर अतिशय वेगवान असून याच्याच मदतीने हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये फेस शिल्ड कोरोनापासून बचाव करण्यासाठी बिनकामाचा असल्याचे समोर आले.

जपानी सुपर कम्प्युटरनुसार प्लॅस्टिक शिल्ड एरोसोल्सला पकडण्यासाठी प्रभावी साधन म्हणून सिद्ध झालेले नाही. तसेच प्लॅस्टिक शिल्ड पूर्णपणे कोरोनापासून संरक्षण करत नसल्याचे देखील सिद्ध झाले आहे. जपानचा हा सुपर कॅम्प्युटर एका सेकंदात ४१५ क्वाड्रिलियानची गणना करू शकतो. यामधून श्वासोच्छवासातून पाण्याचे थेंब कसे पसरले जातात याची देखील शोध लावला आहे.

प्लॅस्टिक शिल्डच्या प्रयोगात या सुपर कॅम्प्युटरने स्टिमुलेशन केले. ज्यामध्ये १०० टक्के एअरबॉर्नज ड्रॉपलेट्स ५ मायक्रोमीटरहून लहान आढळले. त्यामुळे प्लॅस्टिक शिल्ड कोरोनापासून बचाव करण्यासाठी करू शकत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनाचे टीम लीडर असणारे मोटो त्सुबोकोरा म्हणाले की, ‘फेस शिल्डला मास्कचा पर्याय म्हणून पाहू नये. प्लॅस्टिक शिल्ड मास्कच्या तुलनेत कमी सुरक्षित आहे.’


हेही वाचा – शाब्बास रे उंदरा; हजारो लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल मिळालं ‘गोल्ड मेडल’