विराट नाही तर के. एल राहूल असेल इंडियन टीमचा पुढचा कॅप्टन!

virat kohli and kl rahul
विराट कोहली आणि लोकेश राहुल

आयपीएलचा तेराव्या हंगामाला सुरू होऊन आता एक आठवडा झाला आहे. सर्व संघाचे एक एक सामने झाले आहेत. काही रेकॉर्डही खेळाडूंनी आपल्या नावावर केले आहेत. मात्र आयपीएलच्या या हंगामात पहिलं शतक झळकावण्याची कामगिरी केली ती किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुलनं. बंगळुरूविरूद्ध झालेल्या सामन्यात राहुलनं १३२ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं राहुलची खेळी पाहता तो भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकते असे भाकित केले आहे.

गंभीरने यावेळी राहुलचं नाही तर पंजाब संघाचे कोच अनिल कुंबळे यांचेही कौतुक केले. कुंबळे सर्वात चांगले कोच असल्याचे गंभीर म्हणाला, बंगळुरू संघाविरूद्ध काल झालेल्या सामन्यात राहुलनं ६९ चेंडूत १३२ धावांची खेळी केली.

‘भारताचा पुढचा कर्णधार होऊ शकतो राहुल’

बंगळुरू विरूद्ध पंजाब सामन्यानंतर क्रिकउन्फोशी बोलताना गंभीर म्हणाला की, बऱ्याच वेळा कर्णधार असताना उतार चढाव येतात. माझ्या मते राहुल उत्तम कर्णधार आहे. विराटचे वय आता ३० आहे. विराटचे वय आता ३० आहे. रोहितनेही तिशी ओलांढली आहे. त्यामुळे येत्या काळात युवा खेळाडूंकडे कर्णधारपद द्यावे. यासाठी राहुल योग्य पर्याय आहे. मात्र त्यासाठी राहुलला तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. राहुलचे कसोटीमध्ये सातत्य नाही आहे”.

गौतम गंभीरने यावेळी कुंबळेचे कौतुक केले. गंभीर म्हणाला की, “केएल राहुल आणि अनिल कुंबळे आयपीएलमधले सर्वात खतरनाक कॉम्बिनेशन आहे. तुम्ही कुंबळेचे कोच म्हणून रेकॉर्ड पाहिले तर, त्यांनी मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकन दिले. कुंबळे बेस्ट कोच आहे.


हे ही वाचा – DC vs CSK Live Update : दिल्लीच्या गोलंदाजांसमोर चेन्नईचं लोटांगण; चेन्नईचा सलग दुसऱ्यांदा पराभव