घरदेश-विदेशफिट इंडिया चळवळीची पंतप्रधानांनी केली घोषणा

फिट इंडिया चळवळीची पंतप्रधानांनी केली घोषणा

Subscribe

निरोगी भारत बनवण्याचे उद्दिष्ट

फिटनेस ही काळाची गरज आहे. आपण आपल्या फिटनेसबद्दल उदासीन होत आहोत. फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून निरोगी भारत बनवण्यासाठी आपण पाऊल उचलायला हवे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत ‘फिट इंडिया’ या चळवळीचा शुभारंभ केला. फिट इंडिया चळवळ ही जनआंदोलन बनली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर फिट इंडिया चळवळीचा पंतप्रधानांनी शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल आम्ही चालतो कमी, मोजतो अधिक. तंत्रज्ञान आज आपल्याला मोजून सांगते की आपण किती पावले चाललो. मोबाइलद्वारे पावले मोजली जात आहेत. काही लोक तर नेहमीच्या कामात इतके गुंतलेले आहेत की, त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. तर, काही लोक भरपूर खाऊन डायटिंगवर चर्चा करत असतात. काही लोक घरात व्यायामशाळा सुरू करतात, मात्र तिच्या साफसफाईसाठी नोकर ठेवतात.

- Advertisement -

आपले जीवन आज तंत्रज्ञानावर विसंबून आहे. तंत्रज्ञानावर विश्वास ठेऊन आपण जगत आहोत. फिटनेस हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवा. काळासोबत चालत असताना फिटनेसबाबत आपल्या समाजात एक उदासीनता आलेली आहे. मात्र फिटनेसला एका उत्सवाच्या रुपात साजरा करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

चीनमध्ये हेल्दी चायना मिशन २०३० सुरू आहे. देशातील नागरिक फिट व्हावेत म्हणून हे मिशन सुरू करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात देखील अशा प्रकारचे मिशन सुरू आहे. ब्रिटनमध्ये २०२० पर्यंत ५ लाख नव्या लोकांना नियमित व्यायामाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेत २०२१ पर्यंत १००० शहरांना फ्री फिटनेस अभियानाशी जोडण्याचे काम सुरू आहे. जर्मनीमध्येही ‘फिट इन्स्टीड ऑफ फॅट’ हे अभियान सुरू आहे. भारतातही फिट इंडिया हे मिशन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन मोदी यांनी केले.

- Advertisement -

मधुमेह, उच्च रक्तदाब हे जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत. जीवनशैली चुकीची असल्या कारणाने हे आजार निर्माण होत आहेत. जीवनशैली योग्य असेल तर आजार होणार नाहीत. जीवनशैलीत बदल केल्यास आजारही दूर होतील. या बदलाचेच नाव आहे ‘फिट इंडिया चळवळ’. हा बदल केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण जगात होत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -