PM Modi in Prayagraj: यूपी निवडणुकीपूर्वी १६ लाख महिलांना मोदींचे गिफ्ट; मोदींनी १००० कोटी केले ट्रान्सफर

PM Modi Attends 'nari Shakti' Programme In UP's Prayagraj; Transfers Rs 1,000 Cr To SHGs
PM Modi in Prayagraj: यूपी निवडणुकीपूर्वी १६ लाख महिलांना मोदींचे गिफ्ट; मोदींनी १००० कोटी केले ट्रान्सफर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संगमनगरीमधील नारी शक्तीच्या महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. परेड मैदानमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटातील (SHG – स्वयं सहायता समूह) महिलांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला दोन लाखांहून अधिक महिला उपस्थिती राहिल्या होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी SHG – स्वयं सहायता समूहाच्या खात्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा निधी ट्रान्सफर केला. याचा १६ लाख महिलांना लाभ मिळणार आहे.

दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांशी संवाद साधताना कोणत्याही विरोधी पक्षाचे नाव न घेताना निशाना साधला. मोदी म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशच्या महिलांनी इथे पूर्वीच्या सरकारचा काळ परत येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे.’ दरम्यान या भव्य कार्यक्रमात मोदींनी स्वयं सहायता समूह म्हणजेच बचत गटांच्या खात्यांमध्ये १००० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. याचा १६ लाख महिलांना लाभ होणार आहे. आता हे हस्तांतरण दीनदयाल उपाध्याय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY) अंतर्गत केले जाईल, ज्यामध्ये ८०,०० एसएचजीला १.१० लाख रुपये प्रति एसएचजीचा कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड (CIF) आणि ६०,००० एसएचजीला रिव्हॉल्व्हिंग निधी मिळेल. १५,००० प्रति बचत गट प्राप्त होईल.

दरम्यान मुलींचे लग्नाचे वय २१ वर्ष वाढवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मुलींना शिक्षणासाठी, पुढे जाण्यासाठी वेळ पाहिजे होता. त्यामुळे मुलींचे लग्नाचे वय २१ वर्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या या निर्णयावर जास्तीकरून महिला खूप खुश आहेत. महिला आता म्हणतात की, पंतप्रधान यांनी आमचे ऐकले आणि हा निर्णय एकदम ठीक आहे. कमी वयात लग्न झाल्यामुळे शिक्षण आणि नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. कमी वयात लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यामुळे अजून काही विचार करू शकत नाही.’


हेही वाचा – ‘जशी शेतकऱ्यांची माफी मागितली, तशी खासदारांचीही माफी मागावी लागणार’; जया बच्चन यांचा भाजपवर