घरताज्या घडामोडीहल्ल्या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, राज्यपालांनी आश्वासन दिल्याचे सोमय्यांचे वक्तव्य

हल्ल्या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, राज्यपालांनी आश्वासन दिल्याचे सोमय्यांचे वक्तव्य

Subscribe

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. खार पोलीस ठाण्यासमोर झालेल्या हल्ल्याची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर बोगस एफआयआर प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील राज्यापालांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी याप्रकरणात निश्चित चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मला मारण्याचा प्लान होता. खार पोलीस ठाण्यात ८० गुंड घुसले कसे? त्यांच्यावर कारवाई का केली नाही? आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहे. पण बोगस एफआयआरवर पांडेंविरोधात कारवाई झाली पाहिजे. राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, या प्रकरणाची निश्चित चौकशी करण्यात येईल असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संजय पांडेंवर कारवाई करा

राज्यपालांकडे मागणी केली आहे. खोट्या एफआयआर प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंवर पहिली कारवाई करा. हे खोटे एफआयआर असून कायद्यात त्याच्यावर अस्तित्वात नाही आहे. म्हणून ते रद्द करण्यात यावे. आज ८४ तास झाले तरी खरी एफआयआर उद्धव ठाकरे का घेत नाही आहेत. किरीट सोमय्या आपल्या समोर उभे आहेत.

आम्ही राज्यपालांचे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कशाप्रकारे बोगस एफआयआरद्वारे खार पोलिसांना कशाप्रकारे अॅक्शन घ्यायला लावली याचे पुरावे दिले आहेत. सगळ्यात पहिली बाब ही आहे की, संजय पांडे यांना मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. खार पोलिसांनी मान्य केलंय, मुंबई पोलीस आयुक्तांनी आमच्याकडे वांद्रा पोलीस ठाण्यातील एफआयआर पाठवले आहेत. ज्या एफआयआरवर पोलिस इंस्पेक्टरची सही आहे. ना तक्रारदार किरीट सोमय्यांची सही आहे. ही एफआयआर अस्तित्वात नाही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उद्धट सरकार आणि पोलीस आय़ुक्त बनवाबनवी सुरु आहे. ते जे ७० ते ८० गुंड होते त्यांना वाचवण्यासाठी खोटी एफआयआर घेतली.

- Advertisement -

पोलीसांच्या पंचानाम्यामुळे वैद्यकीय चाचणी

संजय पांडे किती फेकायचे, उद्धव ठाकरेंची चमच्यागिरी आयुक्त किती करतात. कमांडर काय करत होते. आपल्या सर्वांमुळे मी वाचलो आहे. तुम्ही दाखवले कशाप्रकारे गाडी आली पोलीस कोणीही नव्हते. कमांडोंनी कशा प्रकारे मला वाचवले तसेच कमांडोनी माझी गाडी बाहेर काढली. ज्या दगडामुळे काच फुटली त्याचा, गाडीत दगड होता त्याचा आणि मला झालेल्या जखमेचा पंचनामा पोलिसांनी केला. काच माझ्या हनुवटीला लागली, ती काच माझ्या डोळ्याला लागली असती तर? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

देवाच्या कृपेने आणि कमांडोमुळे वाचलो

देवाच्या कृपेने आणि कमांडोमुळे मी वाचलो आहे. उद्धव ठकारेंची इच्छा पूर्ण झाली नाही. उद्धव ठाकरेंची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून उद्धव ठाकरेंची माफिया सेना प्रश्न करत आहेत. काच फुटली बारीकशी जखम झाली हे मी एफआयआरमध्ये सांगितले आहे. परंतु ठाकरेंची इच्छा होती की, माझ्या डोक्याला दगड लागयला पाहिजे होता असे सोमय्या म्हणाले आहेत.


हेही वाचा : सोमय्यांच्या किरकोळ जखमेतून रक्तस्त्राव नाही, वैद्यकीय अहवालात खळबळजनक खुलासा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -