घरदेश-विदेश'स्पीड ब्रेकर' दीदींना धडा शिकवा- मोदींचा हल्लाबोल

‘स्पीड ब्रेकर’ दीदींना धडा शिकवा- मोदींचा हल्लाबोल

Subscribe

पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये मोदींची प्रचार सभा पार पडली असून, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर सडेतोड टिका केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्यी पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक पूर्व नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये सभा पारपडली. यावेळी त्यांनी केंद्राच्या सगळ्या विकास योजनांमध्ये अडथळा आणणाऱ्या ब्रेक दिदींना धडा शिकवण्याची वेळी आली असल्याची टिका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर केली आहे. या सभेत मोदींनी ममतांच्या मॉं-माटी मानुष या घोषणांवरही टीका केली. ही निवडणूक दिदींना त्यांची जागा दाखवण्यासाठी असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.

दिदींची झोप उडाली

ममता बॅनर्जींनी बंगालच्या लोकांची उपेक्षा केली आहे. लोकांना त्यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी लोकांचा भ्रम निरास केला असून, केंद्राच्या योजना रोखणाऱ्या स्पीड ब्रेकर दिदींची मनमानी आता चालणार नाही. पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे वाहत असून, त्यामुळे दिदींची सध्या झोप उडाली आहे, असा टोलाही त्यांनी ममतांना लगावला आहे. सध्या त्या अशा लोकांना साथ देत आहेत, ज्यांना देशात दोन पंतप्रधान हवे आहेत. यावेळी त्यांनी लोकांना भारताला दोन पंतप्रधानांची गरज आहे का? असे विचारले, ममतांनी मोदी विरोधामुळे चुकीच्या गोष्टींवर देखील मौन पाळले असल्याचे मोदी म्हणाले.

- Advertisement -

दिदींना धडा शिकवण्याची वेळ

अता ममता बॅनर्जींचा खरा चेहरा देशासमोर येणे गरजेचे आहे. केंद्राने चहा मळ्यातील लोकांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीकोनातून आणलेल्या योजनांना दिदींनी ब्रेक का लावला, २०२२ पर्यंत मोदी सरकारला गरीबी हटवायची आहे. मात्र दिदींनी केवळ गरुबी बघायची आहे आणि राजकारण करायचे असल्याचे मोदी म्हणाले. राज्यत विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि दिदींवर दबाव आणून काम करुन घेण्यासाठी तसेच विकासासाठी केंद्रात भाजपला बळकट बनवा असे मोदींनी आपल्या भाषणात लोकांना संबोधीत केले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -