घरदेश-विदेशTime Magazine च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, अदर...

Time Magazine च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला

Subscribe

टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनने नुकतील जगातील सर्वात प्रभावशाली १०० लोकांची यादी प्रसिद्ध केली. (Time Magazine’s 100 ‘most Influential People of 2021) टाइमने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनवाला (Adar Poonawalla) यांचा समावेश आहे. टाइमने २०२१ या वर्षातील जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली होती. टाइसने या १०० प्रभावशाली लोकांची यादी ६ श्रेणींमध्ये विभागली आहे.

या यादीत अमेरिका अध्यक्ष ज्यो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.

- Advertisement -

याशिवाय एलोन मस्कचे नावही ‘इनोव्हेटर्स’मध्ये समावेश आहे. याशिवाय पुतिनविरोधी कार्यकर्ते अलेक्सी नॅव्हलनी आणि रशियात अटक झालेली गायिका ब्रिटनी स्पीयर्स यांचाही या प्रभावशाली व्यक्तींच्या या यादीत स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

या यादीत नेते, कलाकार, पायनियर, चिन्ह, टायटन्स आणि शोधक यांचाही समावेश आहे. तसेच जगातील विविध क्षेत्रातील अनेक प्रभावशाली लोकांचाही समावेश आहे. टाइम मॅगझिनची ही यादी सर्वात शक्तिशाली आणि विश्वासार्ह यादी मानली जाते.

यावर पीएम मोदींच्या टाइम प्रोफाइलमध्ये असे म्हटले गेलं की, स्वतंत्र्य राष्ट्र म्हणून भारताच्या ७४ वर्षांमध्ये तीन प्रमुख नेते होते. यामध्ये जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. देशाच्या राजकारणात वर्चस्व गाजवणारे नरेंद्र मोदी तिसरे नेते आहे. त्यानंतर कोणीही नाही.

तर ममता बॅनर्जी यांच्या प्रोफाइलमध्ये असं लिहिले आहे की, ६६ वर्षीय ममता बॅनर्जी राजकारणात एक निर्भीड महिला नेत्या म्हणून जगासमोर आल्या. ममता यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केले नाही तर त्या स्वतः एक पक्ष आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -