घरCORONA UPDATEपंतप्रधान मोदी १७ जूनला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी व्हिसीद्वारे साधणार संवाद!

पंतप्रधान मोदी १७ जूनला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी व्हिसीद्वारे साधणार संवाद!

Subscribe

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मोदी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. मात्र यावेळी पंतप्रधान पहिल्यांदाच राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, आरोग्य सचिव आणि गृहसचिवांबरोबरही व्हिडीओ कॉन्फ्ररनसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. येत्या१७ जून रोजी दुपारी तीन वाजता ही व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात येणार आहे.

देशात कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखावर पोहचला आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे देशाचे अर्थचक्रही थांबले आहे. यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मोदी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच यावेळी आवश्यक उपाययोजनांवरही मोदी व मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मोदी पहिल्यांदाच विविध राज्यातील गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृहसचिव व आरोग्य सचिवांकडूनही परिस्थिती जाणून घेणार आहेत.

- Advertisement -

या बैठकीत मोदी राज्याला आवश्यक असलेला निधी, मजुरांचे प्रश्न व लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबद्दलही ते मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहेत. ज्या राज्यात संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे अशा महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात व राजस्थानसह इतर राज्यातील मुख्यमंत्र्याचे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरची मतही मोदी जाणून घेणार आहेत.


हे ही वाचा – संतापजनक! नराधम मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्कार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -