घरदेश-विदेशJal Jeevan Mission: पंतप्रधान मोदी आज जल जीवन मिशन अ‍ॅप लाँच करणार

Jal Jeevan Mission: पंतप्रधान मोदी आज जल जीवन मिशन अ‍ॅप लाँच करणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जल जीवन मिशनचे मोबाइल अ‍ॅप (Jal Jeevan Mission App) आणि ‘राष्ट्रीय जल जीवन कोश’ (Rashtriya Jal Jeevan Kosh) लाँच करतील. या दरम्यान, ते ग्रामपंचायती आणि पाणी समित्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय जलजीवन निधीअंतर्गत ग्रामीण भागातील घरे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांवर पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल आणि नळ बसवले जातील. कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी आणि स्वयंसेवी संस्था या निधीसाठी देणगी देऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. २ ऑक्टोबर रोजी ११ वाजता ते जलशक्ती आणि ग्रामविकास या कार्यक्रमात सहभागी होतील. या दरम्यान, ते ग्रामपंचायती आणि पाणी समित्यांशी संवाद साधून त्यांना पाण्याची जाणीव करून देतील आणि या अभियानाचे फायदे सांगतील. यासोबतच जल जीवन मिशन अ‍ॅप आणि राष्ट्रीय जल जीवन फंड देखील लाँच केला जाणार आहे.

- Advertisement -

यामध्ये ११ ते १२ वाजेपर्यंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी दादरीच्या ग्रामस्थांशी जल जीवन मिशन संदर्भात देखील संवाद साधतील. आज २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दादरी जिल्ह्यातील सर्व १६८ ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसंवाद कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या दिवशी पंचायतीने गावांमध्ये स्वच्छता मोहीमही राबवली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जल जीवन मिशनची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश प्रत्येक घराला पाणीपुरवठा करणे आहे. सध्या ग्रामीण भागातील केवळ १७ टक्के लोकांना पाणीपुरवठा आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -