घरदेश-विदेशVideo: 'निहंग' शिखांचा पोलिसांवर तलवारीने हल्ला; रागात हात छाटला

Video: ‘निहंग’ शिखांचा पोलिसांवर तलवारीने हल्ला; रागात हात छाटला

Subscribe

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या लोकांनी तलवारी काढत पोलिसांवरच हल्ला केला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असतानाही लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या कमी नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी देण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांत पोलिसांवरच हल्ला झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. असा एक अमानवी प्रकार पंजाबच्या पटियालात सनाऊर रोड येथे घडला आहे.

लॉकडाऊन असताना घरात सुरक्षित रहा, असे सांगणाऱ्या पोलिसांवर चक्क तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये एका पोलिसाचा थेट हात छाटला गेला तर या संतापजनक घटनेत दोघं गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या पटियाला येथील मोठ्या भाजी मंडी सनाऊर रोडवरील कर्फ्यू दरम्यान लोकांनी पोलीस पथकावर तलवारीने हल्ला केला.

- Advertisement -

 

- Advertisement -

शिख पारंपारिक शस्त्रे परिधान केलेले आणि निळे लांब शर्ट घातलेले चार-पाच ‘निहंग’ कारने फिरत होते. यावेळी मंडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना साधारण सकाळी सहा वाजता भाजी मार्केटजवळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर या लोकांना अत्यावश्य़क सेवेतील पास (curfew passes) दाखवायला सांगण्यात आले. परंतु, त्या लोकांनी आपली गाडी थेट समोर असलेल्या गेट आणि बॅरिकेड्सला धडकवली, असे पटियालाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनदीपसिंग सिद्धू यांनी सांगितले.


Video – लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या नगसेवकावर गुन्हा दाखल!

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या लोकांनी तलवारी काढत पोलिसांवरच हल्ला केला. या हल्यात पोलिसांवर तलवारीचा वार केल्यामुळे एका सहाय्यक सब इन्स्पेक्टरचा (एएसआय) हात छाटला गेला तर पटियाला सदर पोलीस स्टेशनच्या प्रभारीला गंभीर दुखापत झाली असून दुसर्‍या पोलीस अधिकाऱ्याच्या हातालाही या हल्ल्यात दुखापत झाली आहे.

सहाय्यक सब इन्स्पेक्टरला निहांग येथून राजेंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना पीजीआयएमआर चंदीगड येथे घेऊन जाण्यासाठी सांगण्यात आले. सहाय्यक सब इन्स्पेक्टर यांनी असे सांगितले की, हल्ला झाल्यानंतर निहंग घटनास्थळावरून पळाला. त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -