घरताज्या घडामोडीगोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी WhatsApp शेअर केली पॉर्न क्लिप, नंतर म्हणाले

गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी WhatsApp शेअर केली पॉर्न क्लिप, नंतर म्हणाले

Subscribe

गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या मोबाईलवरुन पॉर्न क्लिप शेअर झाल्यामुळे गोव्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. जेव्हा ही गोष्ट सार्वजनिक झाली तेव्हा कवळेकर यांनी आपला फोन हॅक झाल्याचा दावा केला. “माझ्या मोबाईलशी छेडछाड करुन कुणीतरी व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये पॉर्न क्लिप शेअर केली.”, असे सांगून चंद्रकांत कवळेकर यांनी गोवा पोलिसांच्या सायबर सेलकडे आपली तक्रार नोंदवली. गोव्याचे गाव (Villages of Goa) या ग्रुपमध्ये ही क्लिप कुणीतरी फॉरवर्ड केल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्तान टाइम्स या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच कवळेकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिलांनी केली आहे.

कवळेकर म्हणाले की, मी गोव्याचे गाव या व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपवर कुणीतरी माझ्या मोबाईलद्वारे पॉर्न क्लिप शेअर केली. माझे नाव बदनाम करण्यासाठी कुणीतरी जाणुनबुजून हे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. मी अनेक ग्रुपचा सदस्य असतानाही केवळ याच ग्रुपमध्ये पॉर्न क्लिप कशी काय शेअर झाली? तसेच जेव्हा ही क्लिप शेअर झाली, त्या वेळेला माझा फोन माझ्याकडे नव्हता. मी तेव्हा गाढ झोपलो होतो, अशी माहिती कवळेकर यांनी पोलिसांना दिली.

- Advertisement -

मागच्या काही दिवसांपासून माझे नाव खराब व्हावे आणि माझी प्रतिमा डागाळली जावे, असे प्रयत्न केले जात आहेत. माझ्या फोनशी छेडछाड करत सार्वजनिक जीवनात मला मान खाली घालायला लावणाऱ्या या गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर सक्त कारवाई करावी, अशीही मागणी कवळेकर यांनी केली.

कवळेकर यांच्या मोबाईलमधून रविवारी रात्री १.२० वाजता सदर पॉर्न क्लिप फॉरवर्ड झाली होती. कवळेकर यांच्या विरोधकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कवळेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलमधून अशी पॉर्न क्लिप फॉरवर्ड झाल्यामुळे महिला सभ्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्याद्वारे गुन्हा देखील झाला पाहीजे, अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली.

- Advertisement -

चंद्रकांत कवळेकर हे काँग्रेस तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २०१९ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन उपमुख्यमंत्रीपद मिळवले. भाजपमध्ये येण्यापुर्वी ते गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -