घरदेश-विदेशप्रताप सारंगी गरीब तर हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत मंत्री; मोदींचा नंबर ४६...

प्रताप सारंगी गरीब तर हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत मंत्री; मोदींचा नंबर ४६ वा

Subscribe

नरेंद्र मोदी यांच्या २.० मंत्रिमंडळात ५७ मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी तब्बल ५१ मंत्री हे कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. तर केवळ पाच मंत्र्यांची संपत्ती एक कोटीच्या खाली आहे. असोसिएशन फॉर ड्रेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून मंत्र्यांची संपत्ती आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा अहवाल दिला आहे. मोदी मंत्रिमंडळातील ओडिशाचे प्रताप सारंगी हे सर्वात गरीब मंत्री ठरले आहेत, त्यांच्याकडे १३ लाखांची संपत्ती आहे, तर अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांच्याकडे २१७ कोटींची संपत्ती असून त्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत खासदार ठरल्या आहेत.

- Advertisement -

सर्व मंत्र्यांच्या संपत्तीची सरासरी काढल्यास ती १४.७२ कोटी इतकी होते. यापैकी फक्त ४ मंत्र्यांनी ४० कोटीहून अधिक संपत्ती असल्याचे सांगितले आहे. हरसिमरत कौर यांच्यानंतर मुंबईचे पियूष गोयल हे श्रीमंत मंत्र्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांच्याकडे ९५ कोटींची संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांकार राव इंद्रजीत सिंह (संपत्ती – ४२ कोटी) आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहेत भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह आहेत. त्यांनी ४० कोटी संपत्ती असल्याचे सांगितले आहे.

मंत्रिमंडळातील श्रीमंताच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४६ व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी २ कोटी संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -