घरदेश-विदेशराष्ट्रपती भवनातून मोठी बातमी! राष्ट्रपती कोविंद यांच्यावर बायपास करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

राष्ट्रपती भवनातून मोठी बातमी! राष्ट्रपती कोविंद यांच्यावर बायपास करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Subscribe

राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रकृतीसंदर्भात अधिकृत निवेदन जारी

राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रकृतीसंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. यामध्ये राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २७ मार्च रोजी दुपारी राष्ट्रपती कोविंद यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी राष्ट्रपतींना बायपास प्रक्रिया पार पाडण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी त्यांच्यावर एम्समध्ये नियोजित बायपास प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत असून मंगळवारी त्यांच्यावर एम्समध्ये नियोजित बायपास प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रपती भवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींची प्रकृती सध्या स्थिर आहे. २७ मार्च रोजी दुपारी राष्ट्रपतींना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी राष्ट्रपतींना बायपास प्रक्रिया पार पाडण्याचा सल्ला दिला आहे. यानुसार, मंगळवारी त्यांच्यावर एम्समध्ये नियोजित बायपास प्रक्रिया सुरू असून सध्या ते एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

- Advertisement -

शुक्रवारी सकाळी छातीत दुखू लागल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांकरता त्यांना एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले होते की, ‘राष्ट्रपतींच्या नियमित वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांकडून त्यांची देखरेख केली जात आहे. त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी करणाऱ्या सर्व शुभचिंतकांचे राष्ट्रपतींनी आभार व्यक्त केले आहेत.’

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -