घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha 2024 : वसंत मोरेंची मराठा समाजाला साद, मनोज जरांगेंची घेणार...

Lok Sabha 2024 : वसंत मोरेंची मराठा समाजाला साद, मनोज जरांगेंची घेणार भेट

Subscribe

वसंत मोरे हे पुणे लोकसभेतून निवडणूक लढण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता मोरेंनी थेट मराठा समाजाला साद घातल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून बाहेर पडलेले पुण्यातील डॅशिंग राजकीय नेते वसंत मोरे यांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. मनसेमधून बाहेर पडत मोरे यांनी पुण्यातून महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, मविआकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. ज्यानंतर वसंत मोरे यांच्या हाती निराशी आल्याचे दिसले. पण यानंतरही वसंत मोरे हे पुणे लोकसभेतून निवडणूक लढण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता मोरेंनी थेट मराठा समाजाला साद घातल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर वसंत मोरे यासाठी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Vasant More will meet Manoj Jarange to contest Lok Sabha elections from Pune seek help of Maratha community)

हेही वाचा… Ramdas Athawale : वंचितचे स्वतंत्र लढण्याचा लाभ महायुतीला, आठवलेंची प्रतिक्रिया

- Advertisement -

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये लढत होणार आहे. पण वसंत मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. पण यासाठी आता मोरेंनी मराठा समाजाला साद घातलेली पाहायला मिळत आहे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक काल पुण्यात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली. ज्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

वसंत मोरे यांनी या बैठकीला हजेरी लावत सकल मराठा समाजाने त्यांना निवडणुकीत मदत करावी, अशी साद घातल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पुण्यातून मी 100 टक्के खासदारकीची निवडणूक जिंकणारच, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या 7 एप्रिलला मोरे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण खरंच मराठा समाजाकडून वसंत मोरे यांनी निवडणुकीत मदत करण्यात येणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे, वसंत मोरे यांनी काल मराठा समाजाच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ज्यामुळे त्यांनी बैठक संपताच त्याठिकाणाहून काढता पाय घेतला. बैठकीमधील काही मराठा समन्वयकांनी वसंत मोरे यांना हटकले आणि चर्चेपासून विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला. वसंत मोरेंना याचा राग आला आणि ते तडकाफडकी त्या ठिकाणावरुन निघून गेले. तर ते यावेळी उमेदवारीचा फॉर्म न घेताच बैठकीतून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे आता वसंत मोरे यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -