घरक्रीडा...अन् भाजपाच्या नेत्यांसोबत आम्ही आनंदाने उड्या मारल्या, प्रियंका गांधींनी शेअर केली आठवण

…अन् भाजपाच्या नेत्यांसोबत आम्ही आनंदाने उड्या मारल्या, प्रियंका गांधींनी शेअर केली आठवण

Subscribe

जेवढे नेते गेले होतो, भाजपाचे असो वा काँग्रेसचे आम्ही सगळेच इतके खूश झालो की, आनंदाने उड्या मारल्या आम्ही."

नवी दिल्ली – भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच म्हणजे संपूर्ण जगासाठी उत्सुकतेचा क्षण असतो. जगभरातील क्रिकेटप्रेमी यावेळी हातातील कामं टाकून क्रिकेट पाहत बसतात. यात नेतेमंडळी तरी कसे मागे राहतील? असाच एक किस्सा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शेअर केलाय. तसेच, आजच्या मॅचसाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या आहेत.

हेही वाचा – शिया कप २०२२: क्रिकेटच्या मैदानावर भारत – पाकिस्तान आज भिडणार

- Advertisement -

प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं की, माझी खूप स्पेशल मेमरी आहे. काही वर्षांपूर्वी मी कराची येथे इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी गेले होते. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही, जेव्हा भारत विजयी ठरला. जेवढे नेते गेले होतो, भाजपाचे असो वा काँग्रेसचे आम्ही सगळेच इतके खूश झालो की, आनंदाने उड्या मारल्या आम्ही.”

क्रिकेटच्या मैदानात सारेजण आपलं शत्रुत्व-मित्रत्व विसरून खेळाडू बनतात. तसेच, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असली की सगळे भारतीय एक होऊन क्रिकेटचा आनंद लुटतात. राजकारणातील विरोधक-सत्ताधारीऱ्यांचीही अशावेळी क्रिकेटप्रेमी म्हणून एकी होते. त्यामुळे क्रिकेट पाहायला गेल्यावर अनेक नेतेमंडळी आपली विचारधारा विसरून एकमेकांसोबत क्रिकेटचा आनंद लुटतात. असाच एक किस्सा प्रियंका गांधी यांनी शेअर करून क्रिकेटप्रेमाची प्रचिती दिली आहे.

- Advertisement -


दरम्यान, आज आशिया कप २०२२ मध्ये दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतातील खेळाडूंनी संपूर्ण भारताने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, प्रियंका गांधींनीही त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणीत केला आहे. तब्बल दहा महिन्यांनंतर भारत आणि पाकिस्तान आज आमने सामने ठाकणार आहेत. गेल्या टी-२० स्पर्धेत पाकिस्तानने भारताला हरवलं होतं. अवघ्या थोड्या फरकाने भारत पराभूत झालेला. त्यामुळे यावेळेच्या सामन्यात भारत पाकिस्तानला धोबीपछाड करून पाकिस्तानचा बदला घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -