घरमनोरंजनराजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका; कुटुंबीयांचे आवाहन

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका; कुटुंबीयांचे आवाहन

Subscribe

विशेष म्हणजे, देशातील प्रसिद्ध डॉक्टर नितीश नाईक(dr. nitish naik) यांच्या नेतृत्वाखाली राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचसंदर्भात प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं अवाहन राजू श्रीवास्तव यांच्या परिवाराकडून करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव(raju shrivastav) दिल्लीमधील एम्स रुग्णालयात(aiims hospital) दाखल झाले त्याला आता 19 दिवस झाले पण तरीही ते शुद्धीवर आलेले नाहीत. एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीच महत्वाची सुधारणा झालेली नाही. दरम्यान, 25 ऑगस्ट गुरुवारी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना शुद्धी आल्याचे वृत्त आले होते, परंतु एम्सच्या डॉक्टरांनी ते साफ नाकारले. विशेष म्हणजे, देशातील प्रसिद्ध डॉक्टर नितीश नाईक(dr. nitish naik) यांच्या नेतृत्वाखाली राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत.  कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं अवाहन राजू श्रीवास्तव यांच्या परिवाराकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा – प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो रद्द; पोलिसांकडून परवानगीस विरोध

- Advertisement -

सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका

दरम्यान, राजू श्रीवास्तव(raju shrivastav) यांच्या प्रकृतीबाबत सध्या सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरत आहेत. तर त्या कडे लक्ष देऊ नका असं वाहन राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांकडून आणि नातेवाईकांकडून सातत्याने जनतेला करण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा(antara shrivastav) हिने नुकतीच आपल्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. यासोबतच चाहत्यांनी एम्स किंवा राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत सोशल मीडियावर विश्वास ठेवावा. असं आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ 29 जून 2023 रोजी होणार प्रदर्शित

राजू श्रीवास्तवraju shrivastav) यांची मुलगी अंतरा हिने दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू का होईना पण सुधारणा होत आहे. असे असलं तरीही ते व्हेंटिलेटरवर आहेत. यासोबतच अंतराने जनतेला आवाहन केले आहे की, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एम्स किंवा राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत सोशल मीडियावर जी माहिती देण्यात येईल त्यावरच विश्वास ठेवावा. त्याव्यतिरिक्त कोणत्याही अफवांवर(fake news about raju shrivastv) किंवा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका.

हे ही वाचा – खूप बोलावसं वाटतं, पण…बॉलिवूडच्या बहिष्कारावर अमिताभ बच्चन यांचा निशाणा?

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -