घरताज्या घडामोडीPM Modi security lapse: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही चूक नाही, तरीही आम्ही...

PM Modi security lapse: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही चूक नाही, तरीही आम्ही तपास करणार – चरणजीत सिंह चन्नी

Subscribe

पंजाबच्या फिरोजपुरमधील रॅली करण्यासाठी गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षेत मोठी चूक झाल्यामुळे पुन्हा परतले. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या या चुकीनंतर देशभरातील राजकारण चांगलेच तापले. गृहमंत्रालयाने याबाबतचे कारण पंजाब सरकारला स्पष्ट करण्यास सांगितले. यासंबंधीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी गृह विभाग सांभाळणारे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्यासोबत बैठक घेतली. तसेच यादरम्यान पंजाब सरकारने फिरोजपूरच्या एसएसपीला निलंबित केले. त्यानंतर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेसंदर्भात सविस्तर आढावा दिला.

मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फिरोजपूर जिल्ह्यातील दौऱ्या दरम्यान परतावे लागले याबाबत मला वाईट वाटते. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबमध्ये कोणताच धोका नव्हता. याबाबत राजकारण झाले नाही पाहिजे. शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत होते. जर आज मोदींच्या दौऱ्या दरम्यान सुरक्षेत कोणती चूक झाली असेल तर आम्ही त्याचा तपास करू. आम्ही त्यांना खराब हवामान आणि परिस्थितीमुळे दौरा रद्द करण्यास सांगितला होता. आम्हाला मोदींच्या ताफ्याने अचानक मार्ग बदलल्याचे कोणतीही सूचना दिली नव्हती. मोदींच्या दौऱ्या दरम्यान कोणतीही चूक झाली नाही.

- Advertisement -

पुढे चन्नी म्हणाले की, मला सुद्धा फिरोजपूरमधील पीजआयच्या सॅटेलाईट सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जायचे होते. परंतु माझ्या स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जावू शकलो नाही. पण पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला जाणे हा खूप गर्वाचा क्षण असतो. दरम्यान केंद्राच्या एजेंसीसोबत पंजाब पोलिसांनी शेतकऱ्यांना मार्गातून हटवले होते. केंद्राच्या एजेंसी प्रत्येक गोष्टींचे मॉनिटरिंग करत होती. जेव्हा पीएम कार्यालयाकडून कार्यक्रमाबाबत माहिती आली होती, तेव्हा पंजाब सरकारने कोणताही हस्तक्षेप केला नव्हता. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणताच धोका नव्हता. शेतकरी आंदोलक पहिल्यापासून आंदोलन करत होते.


हेही वाचा – pm rally in punjab: मी एअरपोर्टवर जिवंत परतलो हेच… मोदींचा ताफा अडवल्यानंतर CMवर आगपाखड

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -