घरताज्या घडामोडीआम्हाला माहितेय तुमच्या फोनमधलं ते काय वाचतायतं, फोन हॅकवरुन राहुल गांधींचा केंद्रावर...

आम्हाला माहितेय तुमच्या फोनमधलं ते काय वाचतायतं, फोन हॅकवरुन राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

Subscribe

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी फोन हॅकिंग वरुन विरोधकांनी गदारोळ घातला

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातू करण्यात हेणाऱ्या हेरगिरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प्रेगाससच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेते, पत्रकार आणि बड्या नेत्यांवर व उद्योजकांचे फोन हॅक करुन त्यांच्यावर नजर ठेवली जात असल्याच्या आरोपावरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आम्हाला माहिती आहे की, आम्हाला माहिती आहे की, ते तुमच्या फोनमध्ये काय वाचत आहेत. असं विधान राहुल गांधींनी केलं आहे. भारतातील ३०० हून अधिक लोकांचे फोन हॅक करण्यात आले असल्याचे वृत्त समोल आल्यानं देशात खळबळ माजली आहे.

पॅरिमधील फॉरबिडेन स्टोरीज संस्था आणि एमनेस्टी इंटरनेशनल सारख्या प्रसिद्ध यंत्रणांनी मिळून तपास केल आहे. यामध्ये भारतीयांचेही नाव आले फोन हॅकींगमध्ये आले आहे. एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारला यावरुन सवाल केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी फोन हॅकिंग वरुन विरोधकांनी गदारोळ घातला होता.

- Advertisement -

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी म्हटलं आहे की, आम्हाला माहिती आहे की, ते तुमच्या फोनमध्ये काय वाचत आहेत. तुमच्या फोनमधील सगळचं ते पाहत आहेत. यामध्ये राहुल गांधींनी मागील ३ दिवसांचेही ट्विट जोडले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधींनी म्हटलं आहे की, तुम्ही काय वाचताय? भारतातून द वायरनेही या संशोधनात सहभाग घेतला होता. यामध्ये भारतातील ३०० हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

सर्वाधिक मंत्री, विरोधी पक्षातील नेते, पत्रकार, माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गजांचाही फोन हॅक करण्यात आला आहे. हे फोन हॅकिंग इस्रायली फोन हॅक सॉफ्टवेअर पेगाससच्या द्वारे कण्यात आली आहे. परंतू हा सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या इस्रायली कंपनी एनएसओचं म्हटले आहे की, काही निवडक देशातील सरकारला हा सॉफ्टवेअर देण्यात आला आहे. तर केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगचा समावेश केला नसल्याचे म्हटलं आहे. तसेच विरोधकांवरील निगराणीचे सगळे आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -