Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश सरकारी बंगला रिकामा करण्याच्या नोटीसवर राहुल गांधींनी दिले उत्तर; म्हणाले...

सरकारी बंगला रिकामा करण्याच्या नोटीसवर राहुल गांधींनी दिले उत्तर; म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मोदी आडनाव प्रकरणी त्यांना 2 वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व गेले आणि त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस आली आहे. या नोटीसीला राहुल गांधी यांनी नोटीसीचे पूर्णपणे पालन केले जाईल असे उत्तरे दिले आहे.

सरकारी बंगला रिकामा करण्याच्या नोटिशीला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेचा नियुक्त सदस्य म्हणून गेल्या चार वर्षांपासून 12 तुघलक लेनमध्ये खासदार म्हणून राहिल्याच्या अनेक आठवणी आहेत. असे असले तरी मी नोटीशीचे पूर्णपणे पालन करेन.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील सत्तांतराबाबत तानाजी सावंतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, फडणवीसांच्या आदेशाने…

लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने राहुल गांधींना दिलेला बंगला रिकामा करण्याची नोटीस दिली आहे. या नोटीसनुसार राहुल गांधींना 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करावा लागणार आहे. परंतु राहुल गांधी यांना ३० दिवसांत सरकारी बंगला खाली करायचा नसेल, तर ते हाऊसिंग कमिटीला पत्र लिहून मुदत वाढवून देण्याची मागणी करू शकतात. या मागणीनुसार व्यावसायिक भाडे भरून त्यांना जास्तीत जास्त ६ महिने बंगल्यात राहता येईल.

- Advertisement -

 राहुल गांधींनी कमकुवत करण्याचे प्रयत्न
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बंगला रिकामा करण्याच्या नोटिशीबाबत म्हटले की, भाजपा राहुल गांधींना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल यांनी बंगला रिकामा केल्यावर ते त्यांच्या आई सोनिया गांधींसोबत किंवा माझ्यासोबत राहू शकतात.

- Advertisment -