घरताज्या घडामोडीराहुल गांधींची ईडी कडून उद्याही होणार चौकशी

राहुल गांधींची ईडी कडून उद्याही होणार चौकशी

Subscribe

नऊ तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर राहणार...

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून (ED) सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली. राहुल गांधी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एपीजे अब्दुल कलाम रोड येथील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते. त्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरूवात करण्यात आली. मात्र, तीन तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधींना दुपारी जेवण्यासाठी सुट्टी दिली. परंतु जेवणानंतरही पुन्हा एकदा ते ईडी कार्यालयात दाखल झाले. दरम्यान, नऊ तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधींना ईडीकडून सोडण्यात आले आहे. पण ईडीने राहुल गांधींना उद्या(मंगळवार) पुन्हा एकदा कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांची आज दोन सत्रात ईडीकडून चौकशी करण्यात आली. सकाळच्या सत्रात तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लंच ब्रेक देण्यात आला. त्यादरम्यान त्यांनी गंगाराम रुग्णालयात जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजता पुन्हा एकदा राहुल गांधींच्या चौकशीला सुरूवात करण्यात आली. मात्र, नऊ तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांना काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांना उद्या पुन्हा एकदा ईडी कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. दरम्यान, राहुल गांधी उद्या ईडी कार्यालयात दाखल राहणार की नाही?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : काँग्रेस कार्यकर्त्यांसह राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल

- Advertisement -

काँग्रेसने राहुल गांधींवरील कारवाईचा कडाडून विरोध केला होता. कॉंग्रेसने सकाळपासूनच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं, सकाळपासूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील काही भागांत राहुल गांधी यांचे पोस्टर लावले होते. देशाच्या इतर भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

भाजप खोट्या गुन्ह्याप्रकरणी राहुल गांधींवर कारवाई करत आहे, असा आरोप देखील कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीचे समन्स देण्यात आल्याचा निषेध करण्यासाठी नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसने आंदोलन केले होते.


हेही वाचा : मुंबई काँग्रेसचा ईडी कार्यालयावर मोर्चा; सोनिया, राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -