घरदेश-विदेशजाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितली पावसाळ्यातील कोरोनाची परिस्थिती!

जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितली पावसाळ्यातील कोरोनाची परिस्थिती!

Subscribe

२०२० चा हा पाऊस त्याच्यासह कोरोना व्हायरस वाहून घेऊन जाईल की, या पावसात कोरोना व्हायरसचं सामर्थ्य आणखी वाढेल?

मान्सून भारतात दाखल झाला असून हवामान खात्याने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र आता कोरोना व्हायरसवर पावसाचा नेमका कसा परिणाम होतो, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. यासह २०२० चा हा पाऊस त्याच्यासह कोरोना व्हायरस वाहून घेऊन जाईल की, या पावसात कोरोना व्हायरसचं सामर्थ्य आणखी वाढेल? कोरोना व्हायरसवर पावसाळ्यात नेमका कोणता परिणाम होऊ शकतो, या संदर्भात जगभरातील शास्त्रज्ञांना नेमकं काय वाटतं, हे जाणून घेऊया…

University of Delaware च्या संसर्गजन्य रोग विभागातील शास्त्रज्ञ जेनिफर हॉर्ने यांनी असे सांगितले की, पावसाचे पाणी हा व्हायरस स्वच्छ करू शकत नाही तसेच त्याचा प्रसार देखील कमी होणार नाही किंवा त्यात वाढ देखील होणार नाही.

- Advertisement -

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील अप्लाइड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इव्हान्स यांनी सांगितले की, यंदाच्या पावसाळ्यात कोरोना व्हायरसचा नेमका काय परिणाम होईल, हे अद्याप कळू शकत नाही. मात्र, बहुतेक शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे तसेच सतत असणाऱ्या ओलाव्यामुळे हा व्हायरस अधिक पसरू शकतो.

- Advertisement -

पावसामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढेल. तसेच, वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य, औषध आणि साथीच्या रोगांचे प्राध्यापक जेई बेटेन यांनी असे म्हटले की, कोरोना व्हायरस फैलण्याचा वेग कमी होऊ शकतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये धूळ वाहून जाते तसेच हा जीवघेणा व्हायरस देखील पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ शकतो.

दरम्यान बऱ्याच तज्ज्ञांचे मत आहे की, कोरोना व्हायरस पसरलेल्या भागावर निर्जंतुकीकरण करण्यास पाऊस सक्षम ठरणार नाही. तर हे असेल की, जर आपण पाण्याने आपले हात धुतले तर विषाणू मरणार नाही, परंतु त्याला मारण्यासाठी आपल्या हातांना आपल्याला साबण लावावा लागेल.

मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची अशी काही प्रकरणं समोर आली आहेत की ज्यात १७ दिवसानंतरही पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू जीवंत राहतो. अशा परिस्थितीत, हे सांगणे कठीण आहे की पाऊस कोणत्याही पृष्ठभागावर किंवा जमिनीवर जीवंत असलेला कोरोनाच्या विषाणूचा नाश करेल.

जगभरातील तज्ज्ञ हे लोकांना पावसाळ्यात कोरोना व्हायरस विषयी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत. कारण पावसाच्या आर्द्रतेमुळे कोरोना व्हायरस बरेच दिवस हवेत तरंगू शकतो. यामुळे वेगाने कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो, असे देखील तज्ज्ञांनी सांगितले आहे.


मान्सून ५ दिवस आधीच केरळात दाखल, सरासरीच्या १०२ % पावसाचा अंदाज!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -