घरदेश-विदेशराजस्थानमधील मानगढ धाम राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

राजस्थानमधील मानगढ धाम राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

Subscribe

नवी दिल्ली – राजस्थानच्या बांसवाड जिल्ह्यातील मानगढं धामला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मानगढ धामच्या गौरव गाथा कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सगळे मानगढ धामला आलो आहोत. ही आपल्यासाठी प्रेरक आणि सुखद गोष्ट आहे. मानगढ हे वीर-वीरांगनांच्या तप, शौर्य, त्याग, तपस्या आणि देशभक्तीचं प्रतिक आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा हा वारसा आहे.

- Advertisement -

गोविंद गुरूसारखे महान स्वातंत्र्य सेनानी भारतीय पंरपरा आणि आदर्शांचे प्रतिनिधी आहेत. ते कोणत्याही प्रांताचे राजा नव्हते पण तरीही लाखो आदिवासींसाठी ते हिरो होते. त्यांनी त्यांचा कुटुंब गमावलं, पण तरीही विश्वास कायम ठेवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -