घरदेश-विदेशपायलट भाजपच्या षडयंत्रात सामील; काँग्रेसचा गंभीर आरोप

पायलट भाजपच्या षडयंत्रात सामील; काँग्रेसचा गंभीर आरोप

Subscribe

सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही आहे. भाजप सर्व खेळ खेळत आहे.

राजस्थानमधील सत्तासंघर्षात सचिन पायलट यांना फटका बसला आहे. बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आली. पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन तसंच प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या सरकार पाडण्याच्या षडयंत्रात पायलट सहभागी होते असा आरोप गेहलोत यांनी केला आहे.

सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत गंभार आरोप केले. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली गेहलोत यांनी दिली. “घोडेबाजार सुरु असल्याची आम्हाला कल्पना होती. अखेर हाय कमांडने निर्णय घेतला आहे. भाजप देशभरात घोडेबाजार करत असून मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये करण्यात आला आहे,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सचिन पायलट देखील षडयंत्रात सहभागी होते असा आरोप केला.

- Advertisement -

अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींची तसंच सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाची माहिती दिली. “गेल्या अनेक दिवसांपासून घोडेबाजार सुरु असल्याने हाय कमांडने निर्णय घेणं गरजेतं होतं. हे खूप मोठं षडयंत्र होतं हे आम्हाला माहिती आहे. यामुळे आमचे काही मित्र मार्गापासून भरकटले असून दिल्लीला गेले आहेत. सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही आहे. भाजप सर्व खेळ खेळत आहे. भाजपने रिसॉर्टची व्यवस्था केली असून ते सर्व काही हाताळत आहेत. मध्य प्रदेशात काम करणारी टीम येथे काम करत आहे,” असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – पायलट यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -