घरदेश-विदेशकाँग्रेस 'वाइड बॉल', तर आपची स्थिती 'नो बॉल'सारखी; राजनाथ सिंह यांची जहरी...

काँग्रेस ‘वाइड बॉल’, तर आपची स्थिती ‘नो बॉल’सारखी; राजनाथ सिंह यांची जहरी टीका

Subscribe

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात सत्ताधारी आणि विरोध आमने- सामाने आल्याचे दिसतेय. यात हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून युद्धपातळीवर प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकही सुरू आहे. अशा परस्थितीत देशातील राजकारण्यांनी क्रिकेटचा उल्लेख होणार नाही हे शक्य नाही. क्रिकेटचा केवळ उल्लेखच नाही कर क्रिकेटच्या माध्यमातून राजकारण्यांकडून आरोप -प्रत्यारोप सुरु आहे. यात सोमवारी (7 नोव्हेंबर) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिमाचल प्रदेशातील बैजनाथ येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसला ‘वाइड बॉल’ आणि ‘आप’ला ‘नो बॉल’ असे संबोधले.

राजनाथ सिंह म्हणाले की, “सध्याच्या राजकारणाबाबत क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास, भाजप राजकारणाच्या खेळपट्टीवरील ‘गुड लेंथ बॉल’ बनला आहे, तर काँग्रेस ‘वाइड बॉल’ झाला आहे. तर आपची स्थिती ‘नो बॉल’ सारखी झाली आहे.

- Advertisement -


काँग्रेस खूप प्रयत्न करत आहे पण त्यांचे काम होत नाही. आता काँग्रेस एक तेल संपलेले जहाज झाले आहे. आता कोणताही पायलट आला तरी काँग्रेसला धावपट्टीवरही धावता येणार नाही, उड्डाण तर दूरच. अशी जहरी टीकाही राजनाथ सिंह यांनी केली.

काँग्रेस सत्तेत असताना भारताची अर्थव्यवस्था नवव्या-दहाव्या क्रमांकावर होती. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या तीन देशांमध्ये असेल. हिमाचल प्रदेशात समान नागरी संहिता लागू करण्याचा आम्ही संकल्प केला आहे, आम्ही मते मिळवण्यासाठी हे काम करत आहोत, असे काँग्रेसवाले सांगत आहेत. समाजात फूट पाडून आम्हाला मते मिळवायची नाहीत. गोव्यात अनेक वर्षांपासून समान नागरी संहिता लागू आहे. गोव्यातील समाज तुटला का? असा आरोपही राजनाथ सिंह यांनी केला.


…म्हणून आज बांधावरती जावं लागतंय, श्रीकांत शिंदेंचा नाव न घेता आदित्य ठाकरेंना टोला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -