घरदेश-विदेशजय श्री राम !

जय श्री राम !

Subscribe

बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट होता, असा दावा करत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, साक्षी महाराज, महंत नृत्य गोपाल दास यांच्यासोबत एकूण ४८ जणांविरोधात लखनौ येथे सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला सुरू होता. १ सप्टेंबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर आज ३० सप्टेंबर २०२० रोजी हा निकाल देऊन या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालानंतर अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खासदार संजय राऊत यांनी निकालाचे स्वागत केले आहे. तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र या निकालावर टीका केली आहे.

जय श्री राम !

adavani

- Advertisement -

विशेष न्यायालयाने दिलेला निकाल हा अतिशय महत्वपूर्ण आहे. आमच्या सर्वांसाठीच ही आनंदाची घटना आहे. जेव्हा मला याबाबतची माहिती मिळाली तेव्हा मी पहिली कोणती प्रतिक्रिया दिली असेल तर ही आहे जय श्री राम. रामजन्मभूमीसाठीच्या चळवळीमध्ये माझ्या वैयक्तिक बाबतीत तसेच भाजपच्या प्रतिबद्धता आणि वनचबद्धता या दोन्हीलाही न्याय मिळाला असे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लालकृष्ण अडवाणी
—————————
सत्यमेव जयते !

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत आहे. तत्कालीन कॉंग्रेस सरकारने पूर्वाग्रहातून पूज्य अशा संतांचे, भाजप नेत्यांचे, विश्व हिंदू पदाधिकारी, समाजसेवक आणि खोट्या केसेसच्या माध्यमातून फसविण्यात आले. या षडयंत्रासाठी कॉंग्रेसने जनतेची माफी मागायला हवी.

- Advertisement -

योगी आदित्यनाथ

—————

”न्यायालयाच्या निर्णयाचं शिवसेना तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करत आहेत. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती या सर्वांची मुक्तता झाली आहे. न्यायालयाने हा कोणताही कट नव्हता असं स्पष्ट केलं आहे. हाच निर्णय अपेक्षित होता. आता आपल्याला तो भाग विसरला पाहिजे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे. जर बाबरी पडली नसती तर आज राम मंदिराचं भूमिपूजन झालं आहे तो दिवस पहायला मिळाला नसता. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही,”

संजय राऊत


काळा दिवस
बाबरी निकालानंतर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचा दिवस हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जर मशीद ३२ जणांनी पाडली नाही, तर कुणी पाडली?, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. मस्जिद पाडली गेली नाही तर जादुने पडली का ? असेही ओवेसी म्हणाले.

असदुद्दीन ओवेसी

 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -