घरदेश-विदेशIndependence Day : लाल किल्ल्यावर मर्यादीत पाहुणे तर PPE किटमध्ये दिसणार जवान

Independence Day : लाल किल्ल्यावर मर्यादीत पाहुणे तर PPE किटमध्ये दिसणार जवान

Subscribe

कोरोनाच्या संकटकाळात देशामध्ये १५ ऑगस्ट रोजी ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन केले जाणार आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून यंदा मर्यादीत पाहुण्यांनाच यावेळी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पीपीई किट परिधान करून जवान तैनात राहणार आहेत. या कार्यक्रमात फर्त नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी) ची ५०० मुलं सहभागी होणार असून त्या सर्वांमध्ये ६ फुटाचे अंतर ठेवले जाणार आहे. दरवर्षी साधारण ३ हजार ५०० शाळकरी विद्यार्थी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात.

मात्र कोरोनाच्या संकटकाळात यंदा कार्यक्रमासाठी सर्वांना खुले पास ठेवण्यात आलेले नाही. तसेच यावेळी दोन्ही बाजूला फक्त १५० पाहुणे असणार आहेत. दरवर्षी येथील पाहुण्यांची संख्या ३०० ते ५०० इतकी असते. यावेळी व्हीआयपी पाहुणे समोरच्या रांगेत कुर्चीवर बसलेले पाहायला मिळणार आहेत. एकूण पाहुण्यांची संख्या २ हजाराच्या आसपास असणार आहे. स्वातंत्र्य दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लष्कर, वायू आणि नौदल सेनेतील जवान गार्ड ऑफ ऑनर देतील. यामध्ये साधारण २२ जवान आणि काही अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तर राष्ट्रीय सेल्युटमध्ये ३२ जवान आणि अधिकारी असणार आहेत. सोबत दिल्ली पोलिसदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाच्या आपत्तीत विरोधकांना डावलण्याची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका दुटप्पी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -