रेल्वेकडून ३० जूनपर्यंत प्रवासी तिकिटांचं बुकिंग केले रद्द

प्रवाशांकडून येत्या ३० जूनपर्यंत करण्यात आलेले तिकिटांचे सर्व बुकिंग भारतीय रेल्वेकडून रद्द करण्यात आले आहे.

Indian Railway: more than 1,000 indial railway employees corona positive in every day
Indian RailWay: रेल्वे कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट, दररोज १ हजारांहून कर्मचारी बाधित

भारतीय रेल्वेने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने सांगितले आहे की, प्रवाशांकडून येत्या ३० जूनपर्यंत करण्यात आलेले तिकिटांचे सर्व बुकिंग भारतीय रेल्वेकडून रद्द करण्यात आले आहे. तसेच ३० जूनपर्यंत कोणतेही बुकिंग करता येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचे सर्व पैसे परत केले जाणार आहेत. मात्र, या दरम्यान, रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहणार आहेत.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या १७ मेनंतर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सरु होणार असल्याचे आपल्या संबोधनातून सांगितले होते. या लॉकडाऊनमध्ये काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. त्याबद्दल लवकरच केंद्राकडून दिशानिर्देशही जाहीर केले जाणार आहेत. मात्र, त्याआधीच रेल्वेने थेट ३० जूनपर्यंत प्रवासी तिकिटांचे बुकिंग रद्द केले आहेत. त्यामुळे आता हे लॉकडाऊन कधीपर्यंत असणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तिकिटाचे पैसे करणार परत

प्रवाशांनी काढलेल्या तिकिटींचे पैसे परत करण्यात येणार आहे. मात्र, स्थलांतरीत मजूरांसाठी श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.


हेही वाचा – २२ मे पासून धावणार विशेष ट्रेन; वेटिंग तिकीटही होणार बुक