घरदेश-विदेशआंधळेपणाने मेसेज फॉरवर्ड केलात तर तुरुंगवास नक्की!

आंधळेपणाने मेसेज फॉरवर्ड केलात तर तुरुंगवास नक्की!

Subscribe

आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याने मध्यप्रदेशातील २१ वर्षीय जुनैद खानला ५ महिन्यांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील आंधळेपणाने मेसेज पाठवत असाल तर सावधान!

व्हॉट्सअप वर आलेले मेसेज तुम्ही जर आंधळेपणाणे, शहानिशा न करता पुढे पाठवत असाल तर सावधान! कारण अशा प्रकारे मेजेस पुढे पाठवणे तुम्हाला महागात पडेल. कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता आक्षेपार्ह मेसेज पुढे पाठवल्यास तुम्हाला तुरूंगावास भोगावा लागेल. व्हॉट्सअपद्वारे आक्षेपार्ह मेसेज कोणतीही शहानिशा न करता पुढे पाठवल्याने मध्यप्रदेशातील २१ वर्षीय विद्यार्थ्याला ५ महिन्यांचा तुंगवास भोगावा लागला आहे. त्याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान आणि भांदवि १२४ए अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. जुनैद खान असे या २१ वर्षाच्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या आयुष्याचा प्रश्न आता उभा राहिला आहे. जुनैद खान अॅडमिन असलेल्या ग्रुपवरून आक्षेपार्ह मेसेज पुढे पाठवले गेल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आले आहे. स्थानिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, जुनैद खानच्या कुटुंबियांनी जुनैदला या संपूर्ण प्रकरणामध्ये गोवण्यात आल्याचा आरोप मध्यप्रदेश पोलिसांवर केला आहे.

काय आहे प्रकरण?

मुळचा राजगढचा असलेला २२ वर्षिय जुनैद खान हा बीएसस्सीचा विद्यार्थी आहे. जुनैद खान अॅडमिन असलेल्या ग्रुपवरून आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड पुढे केल्याची तक्रार स्थानिकांनी केली. त्यानंतर मिळालेल्या पुराव्यावरून पोलिसांनी जुनैद खानला अटक केली. दरम्यान, ज्या ग्रुपवरून आक्षेपार्ह मेसेज पाठवले गेले त्या ग्रुपच्या अॅडमिनचे अधिकार जुनैदकडे डिफॉल्टपणे आले. कारण जुनैद मेंबर असलेल्या अॅडमिनने आपले अॅडमिनपदाचे अधिकार सोडले. त्यानंतर ग्रुपच्या अॅडमिनपदाचे अधिकार जुनैदकडे आले. या काळात जुनैद अॅडमिन असलेल्या ग्रुपवरून आक्षेपार्ह मेसेज पाठवले गेले. पण कुटुंबियांनी मात्र हे सारे आरोप फेटाळले असून जुनैद निरापराध असल्याचे म्हटले आहे. ज्यावेळी प्रकरण समोर आले त्यावेळी जुनैद आपल्या कुटुंबासह रतलाममध्ये होता. पण, ज्यावेळी गुन्हा नोंदवला गेला त्यावेळी जुनैदकडे अॅडमिनपदाचे अधिकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुनैदला अटक केल्यानंतर त्याला परीक्षा देखील देता आलेली नाही. परिणामी जुनैदचे शैक्षणिक वर्ष देखील वाया गेले आहे. जुनैद निरापराध असल्याचे म्हणत कुटुंबियांनी मुख्यमंत्री हेल्पलाईनवर आपले म्हणणे मांडले. पण त्यांच्याकडून देखील काहीही उत्तर आले नाही. ज्यावेळी जुनैदच्या ग्रुपवरून मेसेज पाठवला गेला त्यावेळी जुनैदकडे अॅडमिनपदाचे अधिकार नसल्याचे त्याचे कुटुंबिय पोटतिडकीने सांगतात. दरम्यान, जुनैदपुर्वी कोणकोण या ग्रुपचे अॅडमिन होते? याचा देखील सध्या पोलीस शोध घेत आहेत. या साऱ्या प्रकारमुळे आता जुनैदच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

- Advertisement -

मेसेज फॉरवर्ड करताना सावधान !

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मेसेज पसरवले जात आहेत. त्यामुळे अनेक अनुचित प्रकार देखील घडत आहेत. परिणामी अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली असून त्यासाठी कठोर पावलं उचलली गेली आहेत. कोर्टाने देखील यामध्ये लक्ष घातले असून राज्यांना देखील अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -