घरताज्या घडामोडीRussia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्धात आतापर्यंत 115 लहान मुलांचा दुर्दैवी...

Russia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्धात आतापर्यंत 115 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू, तर 140 हून अधिक जखमी

Subscribe

युक्रेनने दावा केला आहे की, आज रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत युक्रेनमध्ये रशियाचे जवळपास १४ हजार ७०० सैनिक मारले गेले.

रशिया युक्रेन युद्धाचा आज २५वा दिवस आहे. २४ फेब्रुवारीला सुरू झालेल्या या युद्धात आजवर हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनमध्ये एकूण ११५ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेन प्रॉसिक्युटर जनरलच्या कार्यालयानुसार, युक्रेनमध्ये आणखी १४० लहान मुले ही सध्या जखमी अवस्थेत आहेत. द कीव इंडिपेंडंटने याबाबत वृत्त दिले आहे.

मारियूपोल सह खारकीवमध्ये आज रशियाने अनेक ठिकाणी जोरदार हल्ले केले. युक्रेनमधील एका शाळेवर रशियाने बॉम्ब हल्ला केला. या शाळेत जवळपास ४०० लोकांनी आश्रय घेतला होता. तसेच मारियूपोल आणि खारकीवमध्ये देखील हल्ले सुरू असून खारकीवमध्ये रशियन सैन्याकडून रात्रभर गोळीबार सुरू होता. या हल्ल्यामध्ये नऊ वर्षांच्या लहान मुलासह पाच लोकांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

२४ फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून युक्रेनने रशियाचे किती नुकसान केले याची नोंद केली आहे. युक्रेनने दावा केला आहे की, आज रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत युक्रेनमध्ये रशियाचे जवळपास १४ हजार ७०० सैनिक मारले गेले. त्याचप्रमाणे ४७६ टँक, १ हजार ४८७ बख्तरबंद लढाऊ वाहने, ९६ विमाने आणि ११८ हेलिकॉप्टर्सचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

युक्रेनच्या मारियुपोल शहरातून एका आठवड्यात जवळपास ३९ हजाराहून अधिक लोक बाहेर पडले आहेत.  सिटी कौन्सिलनच्या अहवालानुसार, रशियाच्या सततच्या हल्ल्यानंतर ८ हजारांहून अधिक खाजगी गाड्या मारिओपोलहून झापोरिझियाच्या दिशेने निघाल्या आहेत.


हेही वाचा –  Pakistan Sialkot Explosion: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मोठे हल्ले, लष्करी तळावर लागली भीषण आग

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -