घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War : पंतप्रधान मोदींची रशिया राष्ट्रपती पुतिन यांच्याशी चर्चा, हिंसेचा मार्ग...

Russia-Ukraine War : पंतप्रधान मोदींची रशिया राष्ट्रपती पुतिन यांच्याशी चर्चा, हिंसेचा मार्ग सोडण्याचे रशियाला आवाहन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. युक्रेनवर सुरु असलेल्या हल्ल्याबाबत पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे. तसेच मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत चर्चा केली आहे. तसेच हिंसेचा मार्ग सोडण्याचे रशियाला आवाहन करण्यात आले आहे. तसेच मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये २० ते २५ मिनिट चर्चा केली आहे. चर्चेतून वाद मिटवा असा सल्ला मोदींनी राष्ट्रपती पुतीन यांना दिला आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अनेक देशांच्या राष्ट्रपतींकडून होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. २० ते २५ मिनिट चर्चा केली आहे. यानंतर दोन महत्त्वाचे समोर आले आहेत ते म्हणजे युक्रेनमध्ये स्थायिक असलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थी यांना देशातून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि नागरिक या ठिकाणी आहेत. नाटो आणि रशियामध्ये संवाद साधून यावर मार्ग काढण्यात येईल असा सल्ला मोदींनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना दिला आहे.

- Advertisement -


हेही वाचा : तिसऱ्या महायुद्धाची चाहूल! पहिले आणि दुसरे महायुद्ध कधी आणि का झाले?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -