घरताज्या घडामोडीsabrimala temple : अतिवृष्टीमुळे अयप्पा सबरीमाला मंदिर बंद, तीर्थयात्राही स्थगित

sabrimala temple : अतिवृष्टीमुळे अयप्पा सबरीमाला मंदिर बंद, तीर्थयात्राही स्थगित

Subscribe

मंदिर बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे अयप्पाच्या भाविकांचा हिरमोड करणारी बातमी समोर आली आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे आणि पूरजन्य परिस्थितीमुळे सबरीमाला मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. तसेच पठानमथिट्टा जिल्हाच्या सबरीमाला मंदिराच्या ठिकाणी भाविकांनी येऊ नये असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार पंबा नदीला पूर आल्याने पंबा धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याशिवाय कक्की अनाथोड तलावाची पातळीही धोक्यापेक्षा अधिक पोहचली आहे. पठानमथिट्टा जिल्हाधिकारी दिव्या एस अय्यर यांनी स्पष्ट केले आहे की शनिवारी पंबा आणि सबरीमाला तीर्थयांत्रा बंद असेल. ज्या भाविकांनी व्हर्च्युअल पद्धतीने मंदिराच्या दर्शनाचे स्लॉट्स बुक केले आहेत, अशा भाविकांसाठी त्यांच्या स्लॉट्सनुसार दर्शनाची व्यवस्था केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी परिस्थिती पूर्ववत होईल, त्यावेळी भाविकांसाठी पुन्हा दर्शनाची व्यवस्था खुली करून देण्यात येणार आहे.

तीर्थयात्रेसाठी आलेल्या भाविकांना स्पष्ट करण्यात आले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव सबरीमाला मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले आहे. ही बंदी एका दिवसासाठी २० नोव्हेंबरसाठी असणार आहे. मोठ्या प्रमाणात भक्त अयप्पा दर्शनासाठी डोंगरावर ट्रेकिंग करत आहेत. दरवर्षी भरणाऱ्या मंडलम मकरविलक्कु तीर्थयात्रेसाठी मंदिर १६ नोव्हेंबरला खुले करण्यात आले होते. याच आठवड्यात सोमवारी मंदिराचा गाभारा हा पुजाऱ्यांच्या हस्ते खुला करण्यात आला होता. सरकारच्या आदेशानुसार व्हर्च्युअल दर्शनाच्या व्यवस्थेनुसार यंदा ३० हजार भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

बंगालच्या खाडीमध्ये कमी दबावाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पुडुचेरी येथे मुसळधार पावसामुळे गुरूवारपासून जनजीवन विस्कळीत आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी नुकताच अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला आहे. यावेळी स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावाही त्यांनी घेतला. तसेच लोकांनाही काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती दिली.

हलाल गुळाचा वाद

केरळच्या सबरीमाला मंदिर आता अतिवृष्टीमुळे चर्चेत असले तरीही भगवान अयप्पा स्वामी मंदिराचा नुकताच चर्चेत राहिलेला वाद म्हणजे प्रसादाचा. हिंदू संघटनांच्या एका गटाने केरळ हायकोर्टात याचिका दाखल करत असा आरोप केला की, या मंदिराच्या ठिकाणी जो प्रसाद बनवला जातो त्यामुळे हलाल गुळाचा वापर करण्यात येतो. या प्रकरणी हायकोर्टानेही अहवाल मंदिर प्रशासनाकडून मागवला आहे. पण या आरोपावर मंदिराच्या अधिकाऱ्यांनी अतिशय अयोग्य भावनेने हा आरोप केल्याचे म्हटले आहे. यावर कोर्टाचा निकाल येणे प्रलंबित आहे. अयप्पा मंदिरात भक्तांना अप्पम आणि अरवाना दिला जातो. या दोन्ही प्रसादामध्ये गुळाचा वापर केला जातो. याआधी २०१८ मध्ये सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशासाठीचा निकाल दिला होता. त्यानंतरही मोठा वाद उफाळून आला होता.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -