घरताज्या घडामोडीतिसऱ्या आघाडीबाबत राहुल गांधींनी मत मांडले, संजय राऊतांचा खुलासा

तिसऱ्या आघाडीबाबत राहुल गांधींनी मत मांडले, संजय राऊतांचा खुलासा

Subscribe

संजय राऊत हे प्रियंका गांधी यांचीही घेणार भेट

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी राहुल गांधींना काही सल्ला दिला आहे. तर युपीएच्या अनुषंगानेही त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. युपीएचे नेतृत्व कुणी करावे याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच प्रियंका गांधी यांच्यासोबत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार या गोष्टीचाही उलगडा त्यांनी यावेळी केला. एकुणच भाजपविरोधात वेगवेगळे फ्रंट नसावेत सगळ्यांचा मिळून एकच फ्रंट असावा असेही मत त्यांनी यावेळी मांडले.

संजय राऊतांचा राहुल गांधींना कानमंत्र 

आज राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या निमित्ताने मी पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहे. या भेटीचा वृत्तांत त्यांना देईन असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप विरोधात सक्षम विरोधकांची बाजू निर्माण करतानाच राहुल गांधींनीही सक्रीय व्हावा आणि कॉंग्रेसमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा असे राहुल गांधी यांना सांगितल्याचेही ते म्हणाले. समर्थ आघाडी ही एकच असावी हे राहुल गांधींनीही स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावरही चर्चा आजच्या भेटीत झाली. उत्तर प्रदेश निवडणूक आणि गोव्यातील निवडणूक याबाबतची चर्चा झाली आहे, असेही राऊतांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेस असल्याशिवाय थर्ड फ्रंटची युनिटी होऊ शकत नाही. त्यामुळेच विरोधकांचा फ्रंट हा एकच असावा असाही मानस राऊतांनी बोलून दाखवला. या फ्रंटचे नेतृत्व कुणी करावे यासाठीची चर्चा मात्र बसुन करता येईल असेही ते म्हणाले. तीन वेगवेगळे फ्रंट असण्यापेक्षा एकच फ्रंट असावा असेही मत त्यांनी यावेळी मांडले. भाजपविरोधी फ्रंट तयार करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

राहुल गांधी – उद्धव ठाकरे भेट होणार ?

येत्या महिन्यात राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. उद्धवजींनी कामाला सुरूवात केली तर नक्कीच ते राहुल गांधींची भेट घेतील असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. आजच्या भेटीचा तपशील हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच पक्षाला सांगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या भेटीमध्ये विरोधकांचे एकत्र नेतृत्व असावे आणि तीन फ्रंट नसावेत अशीही भूमिका राऊतांनी मांडली. तसेच येत्या काळात थर्ड फ्रंटचे नेतृत्व कुणी करावे हादेखील मुद्दा चर्चेतून सोडवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रियंका गांधी – संजय राऊत भेट

संजय राऊत हे बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान उत्तर प्रदेश निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे का ? असा सवाल संजय राऊतांना करण्यात आला. त्यावेळी फक्त युपीच्या निवडणुकांपुरतीच चर्चा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशपातळीवरील राजकारणाची चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. प्रियंका गांधी या येत्या दिवसांमध्ये गडचिरोली दौऱ्यावरही महाराष्ट्रात येणार आहेत.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -