घरताज्या घडामोडीसौदी अरामकोने चीनला दिला धोका; ७५ कोटींचा करार केला रद्द

सौदी अरामकोने चीनला दिला धोका; ७५ कोटींचा करार केला रद्द

Subscribe

सौदी अरामकोने चीनला मोठा आर्थिक धोका दिल्याचे समोर आले आहे. सौदी अरामकोने चीनबरोबर केलेला ७५ कोटींचा करार रद्द केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनला चांगलाच शॉक लागला आहे.

यासाठी घेतला हा निर्णय

सौदी अरामकोने चीनच्या मदतीने एक रिफायनरी आणि पेट्रोकॉम्प्लेक्सची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार; कोरोनाकाळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नजीकच्या भविष्यात हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज बांधून अरामकोने चीनबरोबरील करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सध्या जगभरात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच अद्याप कोरोनावर लस आलेली नाही. त्यामुळे या महामारीवर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. त्याचप्रमाणे या परिस्थितीचा औद्योगिक जगतावरही विपरित परिणाम होत आहे. या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अरामकोतर्फे नकार देण्यात आला आहे. या करारातील प्रमुख चिनी भागीदार चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन आणि पन्जीन सिन्सेन यांच्यातर्फेही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

भारतात ४४ अब्ज डॉलर गुंतवणार

सौदी अरामकोने चीनसोबतचा १० अब्ज डॉलरचा करार रद्द केल्यानंतर सर्वांची नजर आता भारताशी करण्यात येणाऱ्या ४४ अब्ज डॉलरच्या कराराकडे लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मेगा रिफायनरी प्रकल्पात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची सातत्याने घसरणारी किंमत आणि घटती मागणी यांचा विचार करता अरामको या प्रकल्पातूनही गुंतवणूक मागे घेणार अथवा नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  खोदकाम करणाऱ्या मजुराचे नशीब फळफळले; खाणीत सापडला कोट्यवधीचा हिरा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -