घरदेश-विदेशधक्कादायक! कामावरून काढून टाकल्याने इंदूरमध्ये 7 कर्मचाऱ्यांची विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक! कामावरून काढून टाकल्याने इंदूरमध्ये 7 कर्मचाऱ्यांची विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना इंधूरमध्ये घडली आहे. गुरुवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी पदार्थाचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित कंपनीने नुकतेच सातही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सध्या सर्व कर्मचाऱ्यांना इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जमनाधर विश्वकर्मा, दीपक सिंग, राजेश मेमोरिया, देवीलाल करेडिया, रवी करेडिया, जितेंद्र धामनिया, शेखर वर्मा अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. या घटनेपासून कंपनीचा मालक रवी बाफना आणि पुनीत अजमेरा फरार आहे. सध्या परदेशी पुरा पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कंपनीच्या मालकाने नवीन कंपनी सुरु केली होती. यावेळी नोकरीवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन कंपनीत काम देईन असे आश्वासन मालकाने दिले. मात्र मालकाने तसे केले नाही. ज्यामुळे दबावाखाली येत कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप
रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, मालकाने बुधवारी आम्हाला जुन्या कंपनीतून बाहेर काढल्यानंतर बाणगंगा येथील दुसऱ्या कंपनीत कामावर जाण्यास सांगितले, तसेच न केल्यास सुट्टी घेण्यास सांगितली. मात्र आमच्या जागेवर काम करण्यासाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता येथून नवीन लोकांना आणण्यात आले आणि आम्हाला काढून टाकण्यात आले. परंतु या नोकरीमुळे आता आमच्या कोणाचेही घरी चालू शकत नव्हते, म्हणून आम्ही हे पाऊल उचललं.

- Advertisement -

परदेशी पुरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अजय सिंह कुशवाह यांनी सांगितले की, सात जणांनी विष प्राशन केले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान या सातही जणांना मालकाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता, तसेच आता त्यांना दुसरीकडे हलवले जात होते. अशात कंपनी मालकाकडे कर्मचाऱ्यांनी पगाराची मागणी केली मात्र मालकाने पगार देण्य़ास नकार दिला, त्यामुळे पैसे न मिळाल्याने मजुरांनी हे पाऊल उचलले.

सध्या या प्रकरणाची माहिती घेतली जात असून त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सर्व जण जबाब देण्याच्या स्थितीत आहेत.


भारतीय हवाई दलात मिराज, जग्वारची जागा घेणार स्वदेशी तेजस विमान, राफेलला देणार टक्कर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -