घरताज्या घडामोडीदिल्लीच्या महापौरपदी ‘आप’च्या शैली ओबेरॉय, भाजपला मोठा धक्का

दिल्लीच्या महापौरपदी ‘आप’च्या शैली ओबेरॉय, भाजपला मोठा धक्का

Subscribe

दिल्लीला महापौर कधी मिळणार?, हा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, आज अखेर दिल्ली महापौर पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव केला.

शैली ओबेरॉय या पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक ८६ च्या नगरसेविका आहेत. या विजयानंतर शैली ओबेरॉय यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे आभार मानले.

- Advertisement -

दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. तसेच पुन्हा एकदा दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली.

- Advertisement -

दिल्लीत आज सकाळी महापौर पदासाठी मतदान पार पडले. यावेळी दिल्लीतील १० खासदार, १४ आमदार आणि निवडून आलेल्या २५० पैकी २४१ नगरसेवकांनी मतदान केलं.

३९ वर्षीय शेली ओबेरॉय दिल्लीच्या पूर्व पटेल नगर वॉर्डातून पहिल्यांदाच नगरसेवक आहेत. एक शैक्षणिक आणि राजकारणी, त्या २०१३ पासून आपच्या सदस्या आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी दिल्ली महानगरपालिका निवडणूक लढवली होती. भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध २३९ मतांच्या फरकाने विजयी झाला होता. आपने ६ जानेवारीला महापौर निवडणुकीसाठी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.


हेही वाचा : कारागृहामधील बंदीजनांना स्वखर्चाने अंथरूण वापरण्याची मुभा, अप्पर पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -