शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला

शेअर बाजारात आठवड्याच्या सुरूवातीला मोठी घसरण दिसून आली आहे. यावेळी प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात पडझड झाली आहे. आज सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये सेन्सेक्स २३३.२४ अंकांच्या घसरणीसह ५४,२४८ अंकावर खुला झाला होता. तर, निफ्टी निर्देशांकात ८४.४५ अंकांची घसरण दिसून आली.

निफ्टी ५० मधील २२ शेअरमध्ये तेजी दिसत असून २८ शेअरमध्ये घसरण दिसत आहे. त्याशिवाय, बँक निफ्टीतही खरेदीचा जोर दिसत आहे. सकाळी ९.४० वाजता सेन्सेक्स ३७३ अंकांच्या घसरणी ५४,१०८.६१ अंकावर ट्रेड करत होता. तर, निफ्टी ९१.८० अंकांच्या घसरणीसह १६,१२८.८० अंकावर ट्रेड करत होता.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये १.४० टक्के, एनटीपीसीमध्ये १.३२ टक्के, ओएनजीसीमध्ये ०.३२ टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर भारती एअरटेलमध्ये ४.०२ टक्के, टीसीएसमध्ये ३.९० टक्के, टेक महिंद्रामध्ये २.८३ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वी शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून शेअर मार्केटमध्ये तेजी आली. दोन दिवसांपूर्वी सेन्सेक्स ३३४ अंकांच्या तेजीसह ५४,५१३ वर बंद झाला तर निफ्टी ८६ अंकाच्या तेजीसह १६,२२१ वर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स १५०० अंकांनी वधारला होता. निफ्टी ५० मधील ३२ शेअर वधारले होते. तर, १८ शेअरमध्ये घसरण दिसून आली


हेही वाचा : देशात २४ तासांत १६ हजार ६७८ नवीन कोरोनाबाधित, तर मृत्यूच्या संख्येत वाढ