घरदेश-विदेशCorona Pandemic: खाकी वर्दीला सॅल्यूट! कोरोनाच्या काळात गरोदर महिला DSP थेट रस्त्यावर

Corona Pandemic: खाकी वर्दीला सॅल्यूट! कोरोनाच्या काळात गरोदर महिला DSP थेट रस्त्यावर

Subscribe

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरू असून त्याचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोनाच्या वाढत्या बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना देखील डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहे. कोरोना सारख्या कठीण काळात कोरोना योद्धे अतिशय खंबीरपणे या जीवघेण्या संकटाशी सामना करत आहेत. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दंतेवाडा, छत्तीसगडच्या डीएसपी शिल्पा साहू. सध्या याच संकटात डीएसपी शिल्पा साहू यांची सर्वत्र चर्चा होत असून कौतुकही केले जात आहे.

दरम्यान, महिला पोलीस अधिकारी शिल्पा साहू ज्या कोरोनाच्या संकटातही रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे ५ महिन्यांच्या गर्भवती असतानाही डीएसपी शिल्पा साहू या कोरोना संकटात आणि भर उन्हात रस्त्यावर उभं राहून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्ये दंतेवाडाच्या डीएसपी शिल्पा साहू रस्त्यावर फिरणाऱ्या, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना कोरोनाचं गांभीर्य, भीती समजावून त्यांना घरी बसण्याचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे डीएसपी शिल्पा साहू या स्वतः ५ महिन्यांच्या गर्भवती आहेत. असे असूनही, त्या कर्तव्यावर हजर होऊन, भर उन्हात उभे राहून लोकांना विनाकारण घर सोडू नका, असा सल्ला देत आहे. तसेच कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील त्या करत आहे.

- Advertisement -

त्यांच्या या कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावतानाचा व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यावर नेटकऱ्यांनी कौतुकांचा वर्षाव करत त्यांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. यावेळी इतक्या कठीण काळात आपल्या गर्भातील बाळाची आणि सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची एका युजर्सने वाहावा केली आहे. तर, काहींनी मात्र, त्यांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी, काम करू नये, असे म्हणत काळजी देखील व्यक्त केली आहे.

असे म्हणाले नेटकरी

- Advertisement -

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -