Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तुर्की, सीरियानंतर 'या' भागात मोठ्या भूकंपाची शक्यता, IIT खरगपूरचे संशोधन सुरू

तुर्की, सीरियानंतर ‘या’ भागात मोठ्या भूकंपाची शक्यता, IIT खरगपूरचे संशोधन सुरू

Subscribe

तुर्की आणि सीरियात सहा फेब्रुवारी रोजी भूकंप आला. आतापर्यंत या भूकंपात (Earthquake) सुमारे २१ हजार लोकांचा बळी गेला आहे. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका ठिकाणी भूकंपाचा धोका दर्शवण्यात आला आहे. त्यानुसार, हिमालयात मोठ्या भूकंपाचा धोका असून त्यामुळे हिमाचलमध्येही विध्वंस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुर्की आणि सीरियात सहा फेब्रुवारी रोजी भूकंप आला. आतापर्यंत या भूकंपात (Earthquake) सुमारे २१ हजार लोकांचा बळी गेला आहे. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका ठिकाणी भूकंपाचा धोका दर्शवण्यात आला आहे. त्यानुसार, हिमालयात मोठ्या भूकंपाचा धोका असून त्यामुळे हिमाचलमध्येही विध्वंस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतीय टेक्टोनिक प्लेटची हालचाल पाहता हिमालयीन भागात 8.0 तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता आहे. (shimla turkey syria earthquake iit kharagpur research team reached in shimla after big tremors expected)

IIT Kharagpur भूविज्ञान आणि भूभौतिकी विभागाचे 2 वरिष्ठ संशोधन फेलो आणि 2 कनिष्ठ संशोधन फेलो शिमल्यात पोहोचले आहेत. या संशोधकांची टीम राजधानी (शिमला) मध्ये 20 ठिकाणी सर्वेक्षण करणार आहे. भूकंपाचा धोका, भेद्यता आणि जोखीम मूल्यांकन केले जाणार आहे.

- Advertisement -

टीमचे सदस्य सिनियर रिसर्च फेलो अमरेंद्र प्रताप बिंद यांनी सांगितले की, शिमल्याच्या भूभौतिकीय क्षेत्राची तपासणी केली जाईल. सिमलाचा काही भाग सिस्मिक झोन 4 मध्ये येतो आणि काही भाग झोन 5 मध्ये येतो. शिमल्याच्या जमिनी आणि खडकांचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच याठिकाणी रस्ते, रेल्वे लाईन, पूल, इमारत बांधकामासह इतर बांधकामे कोणत्या पद्धतीने झाली आहेत, त्याचा अभ्यास केला जाणार आहे.

ही टीम एक अहवाल तयार करेल, ज्यामध्ये तोटा कसा कमी करता येईल हे सांगितले जाईल. IIT देशातील अनेक मोठ्या शहरांचा अभ्यास करत आहे. या टीममध्ये सिनियर रिसर्च फेलो ज्योतुला मदान, ज्युनियर रिसर्च फेलो शुभमय माजी आणि प्रीतम सिंह यांचा समावेश आहे.

- Advertisement -

शिमला शहर भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे, बहुतांश इमारती भूकंप प्रतिरोधक नाहीत, मोठा भूकंप झाला तर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते. राज्यात अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने इमारती बांधण्यात आल्या आहेत. अनेक विकासकामे आणि प्रकल्पांमध्येही नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आपत्ती ओढवली तर सिमल्याच्या संजौलीसारखी उपनगरे गजबजून गेली आहेत. इथे जास्त नुकसान होईल.


हेही वाचा – दिल्ली दूर नहीं! देशातील सर्वांत लांब ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेचे आज उद्घाटन

- Advertisment -